छावणी परिषदेने चार हजार मतदारांची नावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 10:00 PM2020-07-09T22:00:55+5:302020-07-10T00:27:50+5:30

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी प्रशासनाने छावणी निवडणूक कायद्यानुसार दि.१ जुलै रोजी मतदारयाद्या जाहीर केल्या आहे. त्यात एकूण मतदारसंख्या ३१ हजार ०४३ असून, गतवर्षी ही संख्या ३५ हजार १०५ होती. त्यामुळे ४०६२ मतदारांची नावे न्यायालयाच्या आदेशान्वये वगळण्यात आली आहेत.

The cantonment council omitted the names of 4,000 voters | छावणी परिषदेने चार हजार मतदारांची नावे वगळली

छावणी परिषदेने चार हजार मतदारांची नावे वगळली

Next

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी प्रशासनाने छावणी निवडणूक कायद्यानुसार दि.१ जुलै रोजी मतदारयाद्या जाहीर केल्या आहे. त्यात एकूण मतदारसंख्या ३१ हजार ०४३ असून, गतवर्षी ही संख्या ३५ हजार १०५ होती. त्यामुळे ४०६२ मतदारांची नावे न्यायालयाच्या आदेशान्वये वगळण्यात आली आहेत. छावणी परिषदेचा निवडणूक कायदा २००७ कलम १२नुसार प्रतिवर्षी महिन्यात घरोघरी मतदारांचे सर्वेक्षण करण्यात दि.१ जुलै रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येते. सदर यादीवर आक्षेप घेणे यासाठी २० दिवसांचा कालावधी जनतेला दिला जातो. तद्नंतर बोर्ड अध्यक्ष हे समिती गठीत करून यावर सुनावणी घेतात व त्यानंतर यादी प्रसिद्ध होते. दरम्यान, २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशभरातील सर्वच छावणी परिषदेने २०१७ पासून मतदारयादी बनविताना सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या तसेच बांधकाम आरखडा मंजूर न करता घरे बांधणाऱ्या नागरिकांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली. देवळालीत मागील वर्षी ३५ हजार १०५ मतदार होते. यावर्षी ३१,०४३ झाली आहे. यात लष्करी भागातील मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात मतदारयादी सर्वेक्षण सुरू होते त्यात घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. मात्र प्रशासनाने सरकारी जमिनीवर वास्तव्य असलेल्या नागरिकांची नावे वगळण्यात आली. परंतु वडिलोपार्जित घरे असून व ज्यांनी यापूर्वी निवडणुका लढविल्या आहे अशांची नावे कमी झाल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.
-----------------
लोकप्रतिनिधींनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार सर्वाधिक मतदार वॉर्ड क्र मांक ७ मध्ये कमी झाले आहे येथे गतवर्षी ४४९८ इतके मतदार होते यंदा मात्र १७९९ मतदार राहिले आहे. यामधून २६९९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. याचप्रमाणे वॉर्ड १,२,३ व ५ येथे देखील नावे कमी झाली आहे. वॉर्ड ४,६,८मध्ये मात्र काही प्रमाणात मतदारांची संख्या वाढली आहे.
लोकप्रतिनिधीसह इच्छुक उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी अजयकुमार यांची भेट घेऊन वॉर्ड ७ मधील मतदारांच्या कमी करण्यात आलेल्या नावाबाबत विचारणा केली. यावर त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात आली आहे. यावर आपण कायद्यातील तरतुदीनुसार बोर्ड अध्यक्षांकडे दाद मागू शकतात.

Web Title: The cantonment council omitted the names of 4,000 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक