छावनी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात मिळणार वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:02+5:302021-05-28T04:12:02+5:30
वेतन व पेन्शनपासून वंचित कामगारांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन कोरोना काळात कामगार वर्गाची वेतन व निवृत्तीवेतन ...
वेतन व पेन्शनपासून वंचित कामगारांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन कोरोना काळात कामगार वर्गाची वेतन व निवृत्तीवेतन मागील तीन महिन्यांपासून न मिळाल्याने होणारी परवड मांडली होती. मंगळवारी कर्मचाऱ्यांनी माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, सुरेश कदम, चंद्रकांत गोडसे, देवीदास गोडसे, संजय कल्याणी आदींसोबत छावनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याशी खा. गोडसे यांचे नेतृत्वाखाली चर्चा केली असता, यांनी सद्यस्थितीत बोर्डाकडे ९० लाख रुपये शिल्लक आहेत, त्यामधून एक महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन अदा करता येतील, तसेच पुणे येथील कार्यालयाकडून २ कोटी रुपये प्राप्त होताच उर्वरित वेतन अदा करू असे सांगितले. मात्र कामगारांना १ नव्हे तर ३ महिन्याचे वेतन, बोनस व सातव्या वेतन आयोगाचा फरक देणे गरजेचेे असल्याचा जोरदार आग्रह युनियन नेत्यांनी लावून धरला. दरम्यान, खा. गोडसे यांनी दिल्ली व पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, २ कोटी रुपये तातडीने पाठवित असून १० कोटी रुपये आठवड्यात मिळतील असे आश्वासन मिळाले. अजय कुुमार यांनी २ कोटी प्राप्त होताच मार्च, एप्रिलचे वेतन व पेन्शन तातडीने अदा करू तर मे महिन्याचे वेतन जूनच्या पहिल्या आठवड्यात अदा करू असे सांगितले. यावेळी सहायक कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, प्रशासकीय अधिकारी उमेश गोरवाडकर, सुरेंद्र मेहरोलिया, रोहिदास शेंडगे, केशव शिंदे, केशव बोराडे, गणेश प्रभू थामेत, राजबिर बहोत, चित्रा सोनवणे, उषा डेंगळे, सतीया शेख, रेखा परदेशी, सरोज सारस, शिवाजी सपकाळे, संजू रजोरा आदी उपस्थित होते.