जेरबंद बिबट्याची मादी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 02:14 PM2020-07-04T14:14:38+5:302020-07-04T14:28:17+5:30

जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

Captive female leopard leaves for Sanjay Gandhi Udyan, Borivali | जेरबंद बिबट्याची मादी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात रवाना!

जेरबंद बिबट्याची मादी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात रवाना!

Next
ठळक मुद्देदारणाकाठी संचार असल्याने खबरदारी गरजेचीमादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे

नाशिक : दारणाकाठी असलेल्या जाखोरी गावात जेरबंद झालेल्या बिबट्या मादीची शनिवारी (दि.४) बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात रवानगी करण्यात आली. मादी पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने काही प्रमाणात दारणाकाठावरील भय कमी झाले असले तरीही या भागात नर बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमे-याने टिपलेल्या छबींवरून स्पष्ट होते. यामुळे दारणाकाठालगतच्या गावकऱ्यांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दारणाकाठालगत बिबट्यांचा वाढता संचार हा वनविभागाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सातत्याने या भागात ट्रॅप कॅमेरे आणि पिंज-यांची संख्या वाढविली जात आहे. नाशिक पश्चिम व पुर्व भागाचे पथक दिवस-रात्र या परिसरात गस्तीवर आहेत. त्यांच्या मदतीला बोरिवलीचे गांधी उद्यानाचे पथकही कार्यरत आहे; मात्र या पथकांमध्ये असमन्वय निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पथकांना विश्वासात न घेता बोरिवलीवरून ‘पाहूणे’ आलेल्या पथकाने ‘एककलमी’ उपाययोजना राबविण्यास सुरूवात केल्याने स्थानिक पथकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.


जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच मादी पिंज-यात अडकली त्यावेळी शेतातून पळताना दोन बिबटे शेतक-यांना नजरेसही पडल्याचे गावक-यांनी सांगितले. यामुळे वनविभागाने याठिकाणी पुन्हा दुसरा पिंजरा तैनात केला आहे. तसेच ट्रॅप कॅमेरेही बसविले आहेत.


 

Web Title: Captive female leopard leaves for Sanjay Gandhi Udyan, Borivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.