जबरी लुटमार करणारे दरोडेखोर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 04:44 PM2018-12-20T16:44:40+5:302018-12-20T16:53:00+5:30

चांदवड : शहरात ऐन भाऊबीजेचे दुसरे दिवशी चांदवड शहरातील शेळके वस्ती परिसरातील शेतकरी समाधान पुंजाराम शेळके यांचे घरात चार ...

Capture robbery | जबरी लुटमार करणारे दरोडेखोर ताब्यात

चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी जबरी चोरी करणारे चार जणांना स्थानिकगुन्हे शाखेचे पथकांनेताब्यात घेतले यावेळी पोलीस निरीक्षक अशोक करपे, राम कर्पे, अरुण पगारे, संजय गोसावी,सुशांत मरकड,मंगेश गोसावी, रविंद्र टर्ले, हेमंत गिलबिले,प्रदीप बहिरम व पथकांतील कर्मचारी.

Next
ठळक मुद्देचांदवड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरगांबाद येथून संशयीतांची टोळी चर्तुभूज

चांदवड : शहरात ऐन भाऊबीजेचे दुसरे दिवशी चांदवड शहरातील शेळके वस्ती परिसरातील शेतकरी समाधान पुंजाराम शेळके यांचे घरात चार अज्ञात चोरटयांनी प्रवेश करुन चाकुचे वार करीत आई सुमनबाई व बहिन सुनीता हिच्या गळ्यातील सोन्याचे दागीने जबरीने हिसकावुन घेतले तर डावखरनगर मधील कृष्णा लक्ष्मण पवार यांचे घरातही सदर चोरट्यांनी प्रवेश करुन त्यांचे पत्नीस चाकुचा धाक दाखवुन सोन्याचे दागिणे लुटमार करुन नेले होते. पोलिसांनी सापळा रचून या टोळीला ताब्यात घेतले आहे.

या दोन्ही घटनाबाबत चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.याबाबत पोलीस अधिक्षक संजय दराडे , अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मार्गदर्शन केले.त्यांनी तपासाची चक्रे फिरविली सी.सी.टी.व्ही. फुटेज व त्यांची गुन्हा करण्याची पध्दत यावरुन अहमदनगर जिल्हयात श्रीरामपुर तालुक्यातील गणेशनगर परिसरातील संशयीताची माहिती घेतली असता ते औरगांबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात नवगाव परिसरात सापळा रचुन शुभम अनिल काळे (२१)गणेशनगर अहमदनगर, विकास ज्ञानेश्वर पवार (२३)रा. ब्राम्हणगाव वेताळ ता. श्रीरामपुर ,अहमदनगर ,भरत तात्याजी काळे , राहुल अनिल काळे रा. गणेशनगर श्रीरामपुर यांनी गेल्या दोन महिन्यापुर्वी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी चांदवड शहरातील दोन घरामध्ये जबरी चोरीची कबली दिली.यावेळी ताब्यात घेतलेले शुभम काळे व विकास पवार हे पैठण तालुक्यातील नवगाव परिसरात राहणारा गुन्हेगार संजय रावसाहेब चव्हाण (३२)रा. तुळजापूर ता. पैठण जि. औरगांबाद यांचे कडे काही दिवसापासून वास्तवास होते. संजय चव्हाण हा सन २००६ पासून सिन्नर पोलीस ठाण्यामधील घरफोडीचे व चोरीचे गुन्हयात फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. तसेच विकास व शुभम हे सध्या बनावट नंबर प्लेट लावून वापरत असलेली बजाज पल्सर मोटार सायकल ही धुळे शहर पोलीस ठाण्याकडील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेले सर्व संशयीतांची टोळी ही सराईत असून त्यांचेविरुध्द नाशिक जिल्हयात चांदवड , सिन्नर , औरंगाबाद जिल्हयात पैठण,सातारा व अहमदनगर जिल्हयात श्रीरामपुर , लोणी,राहता, कोपरगाव, नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दरोडा व इतर गुन्हे दाखल आहेत. इतर साथीदारांचा गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत आहेत. या कामी पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे,अरुण पगारे, संजय गोसावी, सुशांत मरकड,मंगेश गोसावी,रविंद्र टर्ले,हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने संशयीतांना औरगांबाद जिल्ह्यातून ताब्यात घेऊन चांदवड पोलीस स्टेशन मधील दोन गुन्हे उघडकीस आणले.

 

 

Web Title: Capture robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.