पाच दुचाकींसह कार लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:03 AM2019-04-17T01:03:09+5:302019-04-17T01:04:24+5:30

शहरातील विविध रुग्णालये, महाविद्यालये, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, व्यापारी संकुलांच्या वाहनतळांवर डोळा ठेवत चोरट्यांकडून नाशिककरांच्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमधून तब्बल पाच दुचाकींसह एक चारचाकी मोटारही चोरट्यांनी लंपास केली आहे.

 The car with five bikes was fixed | पाच दुचाकींसह कार लांबविली

पाच दुचाकींसह कार लांबविली

Next

नाशिक : शहरातील विविध रुग्णालये, महाविद्यालये, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, व्यापारी संकुलांच्या वाहनतळांवर डोळा ठेवत चोरट्यांकडून नाशिककरांच्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमधून तब्बल पाच दुचाकींसह एक चारचाकी मोटारही चोरट्यांनी लंपास केली आहे. एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लुटून नेल्याने संताप व्यक्त होत आहे.
सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीच्या घटना वाढत असून चोरी, फसवणुकीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. सराफी दुकानांमधून बनावट महिला ग्राहकांकडून लंपास केले जाणारे दागिने, वाहनचोरी, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. या तीन दिवसांत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी गायब केल्या. यामध्ये भय्यासाहेब रविराज कोठवळे (रा. उंटवाडी) यांच्या मालकीची सुमारे ५० हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड दुचाकी (एमएच १५, जीटी ०१५०) त्यांनी डोंगरे वसतिगृहासमोर उभी केली होती. खरेदीसाठी कोठवळे येथील जवळच्या दुकानात गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांची ज्युपिटर दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडे कोठवळे यांनी तक्रार केली आहे.
दुसऱ्या घटनेत पंकज मनोहर राणे (रा. उत्तमनगर) यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच ३०, एम ६३६१) दुचाकी चोरट्याने जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळामधून चोरी केली. तिसºया घटनेत जगन्नाथ संपत कांबळी (रा. सदिच्छानगर) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १५, एआर ६८६२) चोरट्याने जिल्हा रुग्णालय आवारातून लंपास केली. उपनगर, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतूनही प्रत्येकी एक दुचाकी चोरट्याने लंपास केली आहे. त्याचप्रमाणे अंबड पोलीस ठाणे हद्दीतून अल्टो-८०० ही दोन लाख रुपये किमतीची सोपान किसन कावळे यांच्या मालकीची मोटार राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
सिव्हील ‘सॉफ्ट टार्गेट’
शहरातील दुचाकीचोरी करणाºया टोळीचे ‘सॉफ्ट टार्गेट’ जिल्हा रुग्णालयाचे वाहनतळ ठरत आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट- १च्या पथकाने ताब्यात घेतलेल्या दोघा चोरट्यांनीही या वाहनतळातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

Web Title:  The car with five bikes was fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.