कारची कंटेनरला धडक, कारचालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:13 AM2021-04-11T04:13:54+5:302021-04-11T04:13:54+5:30
------------------------ मुलाला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा मालेगावी : शहरातील दानिश पार्क भागात मागील भांडणाची कुरापत काढून लहान मुलाला मारहाण करणाऱ्या ...
------------------------
मुलाला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मालेगावी : शहरातील दानिश पार्क भागात मागील भांडणाची कुरापत काढून लहान मुलाला मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सलमा शेख कुरेशी या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा अबजल हा खेळत असताना मागील भांडणाची कुरापत काढून शोएब, रिहान इम्रान,( पूर्ण नाव माहीत नाही) युसूफ बुढत कुरेशी यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास जगताप करीत आहेत.
---------------------
पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ
मालेगाव : माहेरून एक लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करणाऱ्या पुष्पेन्द्र लालचंद्र खीची यांच्यासह सहा जणांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नीलम पुष्पेन्द्र खीची यांनी फिर्याद दिली आहे. माहेरून पैसे आणावेत म्हणून शिवीगाळ मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार जगताप हे करीत आहेत.
-----------------
सावतावाडीला दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार
मालेगाव : नामपूर-मालेगाव रस्त्यावर सावतावाडी शिवारात दुचाकी चालकाने पायी चालणाऱ्या प्रभाकर शंकर आहिरे (६०) यांना पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात महेश कारभारी अहिरे (रा सोयगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश प्रभाकर आहिरे यांनी फिर्याद दिली आहे दुचाकी (एमएच ४१ बी बी ७९९७) वरून मालेगावकडून नामपूरकडे जात असताना प्रभाकर अहिरे यांना पाठीमागून धडक दिली यात त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी पुढील तपास हवालदार गुंजाळे करीत आहेत.
--------------------
विवाहितेचा छळ
मालेगाव : माहेरून वाहन खरेदीसाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तिघाजणांविरु तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मेघा नीलेश सोनवणे या महिलेने फिर्याद दिली आहे. पती नीलेश भरत सोनवणे, सासू कल्पना भरत सोनवणे, महेश भरत सोनवणे यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार गुजर करीत आहेत.