कारची धडक; पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:31 IST2019-02-11T00:30:11+5:302019-02-11T00:31:17+5:30
टेहरेकडून सोयगावकडे जाणाऱ्या कारने बायपास जवळ धडक दिल्याने पोपट पांडुरंग पांढरे (५८), रा. टेहरे हे ठार झाले. या प्रकरणी छावणी पोलिसांत कारचालक रवींद्र शिवाजी अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारची धडक; पादचारी ठार
मालेगाव : टेहरेकडून सोयगावकडे जाणाऱ्या कारने बायपास जवळ धडक दिल्याने पोपट पांडुरंग पांढरे (५८), रा. टेहरे हे ठार झाले. या प्रकरणी छावणी पोलिसांत कारचालक रवींद्र शिवाजी अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन दौलत बच्छाव रा. टेहरे यांनी फिर्याद दिली. आरोपी रवींद्र शिवाजी अहिरे हे कार (क्र. एमएच४१.
एएस ५४२५) ने सोयगावकडून टेहरेकडे जात असताना बायपास जवळ रस्त्याने पायी जाणाºया पोपट पांडुरंग पांढरे यांना धडक दिली. यामुळे ते रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ठार झाले. दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना
घडली. या प्रकरणी छावणी पोलिसतिं गुन्हा दाखल
करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक कोलते करीत आहे.