टायर फुटल्याने कार उलटली; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:36+5:302021-05-07T04:15:36+5:30

--- नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर येथून भरधाव जाणाऱ्या एका कारचे पुढील बाजूचे टायर फुटल्याने कार उलटून झालेल्या ...

The car overturned due to a flat tire; One killed | टायर फुटल्याने कार उलटली; एक ठार

टायर फुटल्याने कार उलटली; एक ठार

googlenewsNext

---

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर येथून भरधाव जाणाऱ्या एका कारचे पुढील बाजूचे टायर फुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. आकाश दीपक चंदिले (२७ रा. तोफखाना, दिल्ली गेट, अहमदनगर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अहमदनगर येथील तिघे मित्र मंगळवारी (दि.४) मध्यरात्री स्विफ्ट कारमधून (क्र. एमएच १२ आरएन ७४४९) एक्स्लो पॉइंटकडून सातपूरच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या कारच्या पुढील बाजूचे एक टायर फुटले. कार वेगात असल्याने उलटली. यावेळी कारमध्ये बसलेले गौरव विकास सावंत, अमोल अरुण सोनवणे हे दोघे जखमी झाले.

तिघे मित्र संजीवनगर येथील इंडस्ट्रीयल वजन काट्यासमोरून प्रवास करीत असताना हा अपघात घडला. कारचा वेग इतका होता की कारचालकाला नियंत्रण मिळविणे अवघड झाले आणि कार उलटून तीनवेळा आदळली. या भीषण अपघातात आकाश गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार रमेश टोपले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात मयत कारचालकाविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The car overturned due to a flat tire; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.