बसस्थानकावरील विक्रेत्यांच्या संसाराची गाडीही धावू लागली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:44+5:302021-08-26T04:17:44+5:30

नाशिक : सलग दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करताना राज्य परिवहन महामंडळाला बसेस बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे बसस्थानकांवर अवलंबून ...

The car of the sellers' world started running at the bus stand! | बसस्थानकावरील विक्रेत्यांच्या संसाराची गाडीही धावू लागली!

बसस्थानकावरील विक्रेत्यांच्या संसाराची गाडीही धावू लागली!

Next

नाशिक : सलग दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करताना राज्य परिवहन महामंडळाला बसेस बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे बसस्थानकांवर अवलंबून असलेल्या हॉकर्स तसेच स्टॉल्सवरील विक्रेत्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आता बसेस सुरळीत सुरू होत असताना बसस्थानकांवरील विक्रेत्यांच्या संसाराची गाडीही रुळावर येत आहे.

बसस्थानकावर पाॅपकॉर्न, खारे शेंगदाणे, लेमन गोळी, वर्तमानपत्र तसेच इतर वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना कोरोनाकाळात आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली होती. गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झालेला असताना आता कुठे त्यांच्या दैनंदिन व्यवसायाला गती येऊ लागली आहे. बसेस सुरळीत सुरू झाल्यामुळे त्यांना साहित्य विक्रीतून दोन पैसे मिळू लागले आहेत.

--इन्फो--

विभागातील स्थानकातून दररोज सुटणाऱ्या बसेस

४५६

स्थानकांवरील विक्रेते

२१३

--इन्फो--

एस.टी. महामंडळाला द्यावे लागते शुल्क

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर विक्री करणाऱ्या स्टॉल्सधारक आणि हॉकर्सला महामंडळाच्या नियमाप्रमाणे शुल्क भरावे लागते. त्यानंतरच त्यांना विक्रीचा परवाना दिला जातो. स्कॅनबारचे भाडे ९५६, जनरल विक्रीभाडे ३ हजार रुपये, परवानाधारक विक्रेत्यांकडून १२०० रुपये भाडे घेतले जाते. शेंगदाणे, पॉपकॉर्न, लेमन गोळ्या विक्रेत्यांकडून दरमहा किमान १००१ रुपये भाडे आकारले जाते.

Web Title: The car of the sellers' world started running at the bus stand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.