दरोड्यासाठी वापरली चोरीची कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:18 AM2019-03-30T01:18:18+5:302019-03-30T01:18:41+5:30

आडगाव परिसरात कोणार्क नगर भागात दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी पाथर्डी फाटा परिसरातून इंडिका कार चोरून तिचाच वापर कोणार्कनगर येथे सराफाचे दुकानावर दरोडा टाकण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.

 The car used for the robbery | दरोड्यासाठी वापरली चोरीची कार

दरोड्यासाठी वापरली चोरीची कार

Next

इंदिरानगर : आडगाव परिसरात कोणार्क नगर भागात दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी पाथर्डी फाटा परिसरातून इंडिका कार चोरून तिचाच वापर कोणार्कनगर येथे सराफाचे दुकानावर दरोडा टाकण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पाथर्डी परिसरातील विनायक अपार्टमेंटमधील रामदास सुखदेव हारक यांनी त्यांची कार दरोड्याच्या रात्री पार्किंगमधून चोरीला गेल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणार्कनगर येथे आर. के. ज्वेलर्स या सराफी दुकानावर गुरुवारी रात्री दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखारांनी वापरलेले वाहन क्रमांक एम.एच. १५ बिडी ९०६६ हे पाथर्डी फाटा परिसरातून चोरले होते असे तपासात निष्पन्न झाले़
पाथर्डी फाटा भागातील गजानननगर येथील विनायक अपार्टमेंटमध्ये राहणारे रामदास सुखदेव हारक (६३) यांनी त्यांची इंडिका कार (क्र. एमएच १५ बिडी ९०६६) बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते पार्किंगमध्ये गेले असता त्यांना पार्किंमध्ये कार नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या घटनेची माहीत तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला

Web Title:  The car used for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.