कार खरेदीला गेले अन् चोरट्याने घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:54 AM2019-11-11T01:54:25+5:302019-11-11T01:55:46+5:30
नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन्यांसह १८ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
पंचवटी : नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन्यांसह १८ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुई अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि.९) दुपारच्या सुमारास चोरट्याने घरफोडी करत दागिने व रोकड लांबविली. देशमुख यांनी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देशमुख कुटुंबीय नवीन चारचाकी बघण्यासाठी त्र्यंबकनाका येथील शोरूममध्ये गेले होते. त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या जुईनगर येथील जुई अपार्टमेंटधील पाच क्रमांकाच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून घरफोडी केली.
भरदिवसा घडलेल्या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तपासाला गती दिली.
अवघ्या काही मिनिटात उरकले कार्य
कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र अंगठ्या, साखळी, कानातील झुबे, नेकलेस पाटल्या, हातातील बांगड्यांसह सोन्या-चांदीच्या वस्तू असे तब्बल ३६ तोळे सोन्या-चांदीचे दागिने तसेच अठरा हजार
रु पयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रु पयांचा ऐवज लांबविला. अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीत चोरट्यांनी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या देशमुख यांच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे.