हृदयरोगाचा झटका आता तिशीच्या तरुणांनाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:25 AM2017-09-29T00:25:50+5:302017-09-29T00:26:03+5:30
जंक फूड, फास्ट फूडला पसंती देणे, व्यायामाकडे दुर्लक्ष करणे आणि मद्यप्राशन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांचा ‘शौक’ पुरविण्याच्या नादात तरुणाई हृदयरोगाची बळी ठरू लागली आहे. मागील तीन वर्षांमध्ये वयाची तिशी गाठलेल्या तरुणांना हृदयरोगाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी नोंदविले.
नाशिक : जंक फूड, फास्ट फूडला पसंती देणे, व्यायामाकडे दुर्लक्ष करणे आणि मद्यप्राशन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांचा ‘शौक’ पुरविण्याच्या नादात तरुणाई हृदयरोगाची बळी ठरू लागली आहे. मागील तीन वर्षांमध्ये वयाची तिशी गाठलेल्या तरुणांना हृदयरोगाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी नोंदविले.
हृदयरोगाविषयी असलेली जागरूकता वयाची पन्नाशी पार केलेल्या गटामध्ये वाढत आहे; मात्र तिशीतला तरुण याबाबत अद्यापही अनभिज्ञ असल्यासारखा वावरत आहे. त्यामुळे त्याच्या हृदयाची कार्यक्षमताही धोक्यात येऊ लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्पर्धेच्या युगातील ताणतणाव आणि व्यसनाधिनतेच्या आहारी जाणारी तरुणाई यामुळे तारुण्यात हृदयरोगाला निमंत्रण मिळत आहे. आहार, व्यायामाविषयी ज्येष्ठांमध्ये जागरूक ता असून, सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाºयांमध्ये त्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र जॉगिंग ट्रॅकवर दिसते.
तरुणाई जीममध्ये जाऊन जरी घाम गाळत असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जीममध्ये जाणाºया तरुणांमध्येही आहाराविषयी जागरूक राहणारे तरुण फार कमी आढळून येतात, असे हृदयरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यामुळे हृदयरोग आता तारुण्यात ‘धक्का’ देऊ लागला आहे.
...तर वेळीच व्हावे सावध !
तुम्ही जर दररोज ट्रॅकवर पाच फेºया न थकता व श्वासोच्छवासामध्ये कुठलाही अडथळा न जाणवता पूर्ण करत असाल आणि एखाद्या दिवशी तीन फेºयांमध्येच जर थकवा जाणवला आणि छाती भरल्यासारखी झाली व श्वास जड होऊन घाम फुटला किंवा दोन मजल्यापर्यंत पायºया चढून सहज जात असताना एखाद्या दिवशी धाप लागली आणि वरीलप्रमाणे स्थिती झाली तर सावध होऊन हृदयाच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
अल्कोहोल वाढवितो ‘एलडीएल’
अल्कोहोलचे प्रमाण शरीरात अधिक गेल्यास रक्तामध्ये ‘कोलेस्ट्रॉल एलडीएल’ वाढून रक्तवाहिन्यांमध्ये त्याचे थर साचू लागतात. एखाद्या जलवाहिनी किंवा मलवाहिनीमध्ये जसा गाळ साचतो त्याप्रमाणे रक्तवाहिन्यांची अवस्था होऊन हृदयाला झटका येतो, असे हृदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अल्कोहोल हे हृदयासाठी हानिकारक ठरणारे आहे.