मालेगावला कोरोना सैनिकांची हेळसांड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:26 PM2020-05-03T16:26:22+5:302020-05-03T16:37:12+5:30

संपूर्ण देशभरात कोरोनााविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टर नर्सेसला लढवय्याचे आणि  देवत्वाचे स्थान दिले जात असताना नाशिकमधील मालेगावमध्ये मात्र कोरोना विरोधात लढण्यासाठी गेलेल्या नर्सेसी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नाशिकहून मालेगाव येथे कर्तव्य बजाविण्यासाठी गेलेल्या नर्सेसची राहण्याची गैरसोय होत असून मालेगाव येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना एकाच वस्तीगृत ठेवण्यात आल्याने महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Care of Corona soldiers at Malegaon | मालेगावला कोरोना सैनिकांची हेळसांड 

मालेगावला कोरोना सैनिकांची हेळसांड 

Next
ठळक मुद्देमालेगावला नर्सची कर्मचाऱ्यांची हेळसांडनिवासाची व्यवस्था असलेल्या वसतीगृहाची दुरावस्था  पुरुष, महिला कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी राहण्याचा सल्ला

नाशिक : कोरोना विरोधात लढयात  जीवाची पर्वा न करता नाशिकहून मालेगाव येथे कर्तव्य बजाविण्यासाठी गेलेल्या नर्सेसची राहण्याची गैरसोय होत असल्याचा प्रकार घडला असून महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी निवासाची व्यवस्था  एकाच ठिकाणी केल्याने नर्सेस कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत या वस्तीगृहात राहण्यास विरोध नोंदविला आहे. या ठिकाणी पोहोचलेल्या सर्व नर्सेस कर्मचाºयांनी  आफले सामान वसतीगृहाबाहेरच ठेवले असून रात्री उशीरापर्यंत त्यांच्या निवासाची कोणतीही ठोस सुविधा करण्यात आलेली नव्हती. 
संपूर्ण देशभरात कोरोनााविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टर नर्सेसला लढवय्याचे आणि  देवत्वाचे स्थान दिले जात असताना नाशिकमधील मालेगावमध्ये मात्र कोरोना विरोधात लढण्यासाठी गेलेल्या नर्सेसी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नाशिकहून मालेगाव येथे कर्तव्य बजाविण्यासाठी गेलेल्या नर्सेसची राहण्याची गैरसोय होत  असून मालेगाव येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात  पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना एकाच वस्तीगृत ठेवण्यात आल्याने महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हे वस्तीगृह बंद असल्याने त्याठिकाणी प्रचंड अस्वच्छता असून वस्तीगृहाची दुरावस्था झालेली आहे. असे असताना कोरोना विरोधात लढणाऱ्या नर्सेसची अशा ठिकाणी व्यावस्था करण्यात आल्याने नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनकडून या घटनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तीव्रता जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली असून त्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तरीही नर्सेस आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी या घटनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली करीत महिला नर्सेस कर्मचाऱ्यांनी राहण्याची व जेवनाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी करण्याची मागणी केली आहे. 

नर्सेस काम करायला तयार आहेत, कोरोनाला आम्ही घारत राहण्याची जेवनाची सुरक्षीत चांगली व्यावस्था व्हावी एवढी माफक अपेक्षा आहे. मालेगावला कोरोना विरोधात लढण्यासाठी गेलेल्या नर्सेच्या राहण्याची व्यवस्था अतिशय दुरावस्था झालेल्या वसतीगृहात करण्यात आली असून महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी व्यावस्था करण्यात आल्याने नर्स कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. अनेक दिवसापासून बंद असलेल्या वसतीगृहची स्वच्छता झालेली आहे. अशा प्रकारांमुळे नर्सेससमोर मानसिक संतुलन राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 
-पुजा पवार, अध्यक्ष नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन  

Web Title: Care of Corona soldiers at Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.