बुस्टर डोस साठी काळजी घेण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 09:20 PM2021-02-24T21:20:18+5:302021-02-25T01:31:45+5:30
नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील घेण्याचे आावाहन त्यांनी केले.
नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील घेण्याचे आावाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी लसीकरणाच्या पहिल्या डोसचा आढावा, तसेच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे सव्हर्लन्स मेडिकल ऑफिसर डॉ. प्रकाश नांदापुरकर, आदी उपस्थित होते.
गेल्या १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील अजूनही ज्या अधिकारी कर्मचारी यांनी लस घेतली नाही, त्यांनादेखील लस घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी लसीकरण मोहिमेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले. पुढच्या काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या संदर्भातील नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. नोडल अधिकाऱ्यांनी पूर्वतयारीबाबतची प्राथमिक माहिती सादर केली.
दरम्यान, झालेल्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये ज्या सुधारणा करणे अपेक्षित आहे त्याबाबतची सुधारणा पुढील टप्प्यात करण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असेही मांढरे यांनी सांगितले.
आजपर्यंत साधारण ४१ हजार ८०७ लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.