केरळला पर्यटनासाठी गेलेल्यांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:22 AM2018-05-25T00:22:22+5:302018-05-25T00:22:22+5:30
नाशिक : केरळमध्ये निपाह या विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, यात अनेक लोक दगावले आहेत. यामुळे नाशिकहून केरळला पर्यटनासाठी गेलेल्या नातेवाइकांची त्यांच्या आप्तेष्टांना चिंता लागली आहे. अनेकांनी भ्रमणध्वनी करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून, काहींनी आपल्या नातेवाइकांना परतण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक यात्रा अर्धवटू सोडून आपापल्या खर्चाने परतत असल्याचे समजते.

पर्यटनक्षेत्र असलेल्या केरळ राज्यात नाशिकहून असंख्य पर्यटक गेले आहेत. केरळमध्ये निपाह या विषाणूचे रुग्ण आढळून आल्यामुळे केरळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांची त्यांच्या नाशिकमधील नातलगांना चिंता लागली आहे. अनेकांनी पर्यटनासाठी गेलेल्या आपल्या आप्तेष्टांना भ्रमणध्वनी करून तब्येतीची विचारपूस करून सुखरूप असल्याबाबतची खात्री करून घेतली, तर काहींनी लवकरात लवकर केरळमधून परतण्याचा सल्लाही दिला आहे. शहरातील काही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून अनेक नाशिककर केरळमध्ये सध्या पर्यटन करीत आहे.