शहर व परिसरात  कारफोडीच्या घटना सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:53 AM2019-07-01T00:53:56+5:302019-07-01T00:54:12+5:30

शहर व परिसरात मोटारींच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा लंपास करणारी टोळी सक्रिय असून, या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 Carfood incidents in the city and the neighborhood continued | शहर व परिसरात  कारफोडीच्या घटना सुरूच

शहर व परिसरात  कारफोडीच्या घटना सुरूच

Next

नाशिक : शहर व परिसरात मोटारींच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा लंपास करणारी टोळी सक्रिय असून, या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२६) गोदाकाठावरील वाहनतळावर उभ्या असलेल्या भाविकांच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दीड ते दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. तसेच आदिवासी विकास भवनच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या मोटारीची काच त्याचदिवशी फोडून चोरट्यांनी वाहनातून टॅब लांबविला. शहर पोलीस प्रशासनापुढे घरफोड्या, मोटारफोडी, वाहन चोरी, मोबाइल, सोनसाखळी लुटीच्या घटना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
रामकुंड परिसरात महापालिकेचे वाहनतळ असून, या वाहनतळावर परराज्यांमधून येणारे भाविक वाहनतळ शुल्क भरून वाहने उभी करतात. जेणेकरून अधिकृत वाहनतळ असल्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील, मात्र या वाहनतळावरील वाहनेही सुरक्षित नसून चोरटे या ठिकाणीही उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा सर्रासपणे फोडून भाविकांच्या मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड लुटून पोबारा करत असल्याचे समोर आले आहे. संबंधित ठेकेदाराने वाहनतळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे भाविकांची फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. याकडे महापालिका व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हरियाणातील गुडगाव येथून हेमंत ठाकूर हे कुटुंबीयांसमवेत पंचवटीमध्ये देवदर्शनासाठी आले होते. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी (एमएच ०६, बीएफ ८५६५) रामकुंड येथील मनपा वाहनतळावर उभी केली. परिसरात ते देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडून डेल कंपनीचा तीस हजार रु पये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर ठाकूर यांनी संबंधित वाहनतळ चालविणाºया व्यक्तींना धारेवर धरत जाब विचारला. वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी यावेळी त्यांनी झटकली. दुसºया घटनेत विशाल बाळासाहेब ढिकले (२९, रा. धनराजनगर, जुना सायखेडारोड) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. विशाल ढिकले यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने बुधवारी दुपारच्या सुमारास मोटारीची (एमएच १५, जीएल ५६९९) काच फोडून १५ हजार रु पयांचा टॅब आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पंचवटीत चोरट्यांचा धुमाकूळ
बुधवारी शहरात कारफोडीच्या तीन घटना घडल्याचे उघडकीस आले. दोन घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. रामकुंडावर परराज्यातील भाविकाची बॅग चोरट्यांनी मोटारीची काच फोडून लांबविली. साहेबराव पंडित दळवी (रा. अमृतधाम, पंचवटी) हे पेठरोडहून एका कामानिमित्त कंपनीच्या मोटारीने (एमएच १५, सीडी ९३७८) जात असताना त्यांनी काही वस्तू खरेदी करण्यासाठी ललवाणी कृषी केंद्रासमोर मोटार उभी केली. वस्तूंची खरेदी करून येत नाही तोच चोरट्यांनी त्यांच्या मोटारीचा दरवाजा उघडून गाडीतील १ लाख ९१ हजार रुपयांची बॅग चोरून नेली. याप्रकरणी दळवी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title:  Carfood incidents in the city and the neighborhood continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.