मालवाहतूकदारांचे ‘चक्काजाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:54 AM2018-07-21T00:54:26+5:302018-07-21T00:55:43+5:30

देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा.

 Cargo handling | मालवाहतूकदारांचे ‘चक्काजाम’

मालवाहतूकदारांचे ‘चक्काजाम’

Next

नाशिक : देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा.  याप्रमुख मागण्यासाठी देशभर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०)देशभरात तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारांहून अधिक मालवाहतूक करण्याऱ्या वाहनांची चाके थांबली आहे.
जिल्हाभरात १५०० हून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक या संपात सहभागी झाले असून, या आंदोलनासाठी निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स व अवजड वाहतूक सेना यांसह विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सरकारने डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तसेच यावरील अधिभार कमी करणे, तसेच देशभरात डिझेलचे दर हे एकसमान असावे, त्याचबरोबर न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा देण्याची मागणी मालवाहतूकदारांनी केली आहे. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून गांधीगिरी पद्धतीने बेमुदत आंदोलन सुरूच राहील. तसेच नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेले व्यावसायिकांचा एकही ट्रकमधून कुठल्याही मालाची वाहतूक करणार नसल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष अंजू सिंगल, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल चंदा, चेअरमन एम. पी. मित्तल यांनी दिली आहे. माल वाहतूकदारांच्या या देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक अवजड वाहतूक सेना, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसारख्या संघटनांनी सहभाग घेतला असून, येत्या दोन दिवसांत प्रवासी वाहतूकदार आणि पुढील तीन चे चार दिवसांत विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बस वाहतूकदारही सहभागी होणार असल्याची माहिती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
चालकांसाठी भोजनाची सेवा
देशभरात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या संपामुळे ट्रकचालकांनी आपल्या मालाची वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. त्यांच्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रकचालकांसाठी भोजनाची सेवा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सागण्यात आले आहे.

Web Title:  Cargo handling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक