मालवाहतूकही करणार : नाशिकच्या उद्योजकांसमवेत कंपनीची बैठक विदेशात जाण्यासाठी कनेक्टिंग विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:18 AM2018-06-01T01:18:47+5:302018-06-01T01:18:47+5:30

नाशिक : येत्या १५ जूनपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा केवळ दोन शहरांमध्ये मर्यादित न राहता अन्य देशांतर्गत आणि विदेशातील शहरांना जोडणारी असणार आहे.

Cargo handling: The company's meeting with the entrepreneurs of Nashik connecting aircraft to travel overseas | मालवाहतूकही करणार : नाशिकच्या उद्योजकांसमवेत कंपनीची बैठक विदेशात जाण्यासाठी कनेक्टिंग विमानसेवा

मालवाहतूकही करणार : नाशिकच्या उद्योजकांसमवेत कंपनीची बैठक विदेशात जाण्यासाठी कनेक्टिंग विमानसेवा

Next
ठळक मुद्दे‘उडान’ योजनेअंतर्गत सेवा नाशिकच्या विमानतळावरून सुरूसंबंधित शहरापर्यंतच्या विमानसेवेचे तिकीट दिले जाईल

नाशिक : येत्या १५ जूनपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा केवळ दोन शहरांमध्ये मर्यादित न राहता अन्य देशांतर्गत आणि विदेशातील शहरांना जोडणारी असणार आहे. त्याचबरोबर कंपनी प्रवासीसेवेबरोबरच कार्गोसेवाही देणार असल्याचे जेट एअरवेजच्या वतीने आयोजित उद्योजकांच्या बैठकीत सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत ही सेवा नाशिकच्या विमानतळावरून सुरू होत असून, त्यासंदर्भात निमा हाउस येथे उद्योजक, व्यापारी संघटना तसेच अन्य व्यावसायिक संघटनांची बैठक गुरुवारी (दि. ३१) घेण्यात आली. कंपनीच्या महाव्यवस्थापक ऋतुजा सिंग आणि एरिया मॅनेजर यझदी मार्कर, खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्टीÑजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, नाशिक सिटिझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग यांच्यासह अन्य उद्योजक यावेळी उपस्थित होते.
कंपनीच्या वतीने सुरू होणाऱ्या या सेवेच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला वेग येईल, असे सांगतानाच दिल्ली येथून बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबादसह अन्य विविध ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा असून, आंतरराष्टÑीय सेवेसाठीदेखील सेवा उपलब्ध होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच ओझरवरून दिल्लीच नव्हे तर अन्यत्रही मालवाहतूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकहून विदेशात जाण्यासाठी नाशिक ते दिल्ली आणि तेथून पुढे जाण्यासाठी संबंधित शहरापर्यंतच्या विमानसेवेचे तिकीट दिले जाईल, अशा विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास सातही दिवस दररोज विमानसेवा देण्याची तयारी दर्शविण्यात आली. चर्चेत दिग्वीजय कापडिया, पुष्कर वैशंपायन, सुनील भायभंग, दत्ता भालेराव यांच्यासह अन्य मान्यवरांनी सहभाग घेतला.

Web Title: Cargo handling: The company's meeting with the entrepreneurs of Nashik connecting aircraft to travel overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.