मालवाहतूकदारांचे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:22 AM2017-10-09T00:22:04+5:302017-10-09T00:22:48+5:30
नाशिक : जीएसटी धोरणांमधील त्रुटी, डिझेल दरवाढ तसेच आरटीओमधील भ्रष्टाचार यांसह केंद्र सरकारच्या मालवाहतूकदारांबाबत असलेल्या आर्थिक धोरणांविरोधात देशपातळीवरील मालवाहतूकदार संघटनांतर्फे सोमवारी (दि़९) व मंगळवारी (दि़१०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे़ आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपास मुंबईतील बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे़

सोमवारी (दि़९) सकाळी आठ वाजेपासून ते मंगळवार (दि़१०) रात्री ८ वाजेपर्यंत राष्ट्रीय पातळीवर हे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे़ केंद्र सरकारच्या नोटाबंदी व कॅशलेसचे संघटनेने स्वागत केले असले तरी जीएसटीमधील काही तरतुदींचा मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे़ जीएसटीमुळे सरकारच्या जीएसटीमध्ये दुपटीने वाढ झाली असली तरी मालवाहतूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे़
केंद्र सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांचा निषेध म्हणून हे आंदोलन केले जात आहे़ मालवाहतूकदारांना डिझेलची दरवाढ, आरटीओ तसेच महामार्ग पोलिसांकडील होत असलेला त्रास व भ्रष्टाचाराबाबतच्या मुद्द्यांचाही समावेश आहे़देशव्यापी संपातून जीवनावश्यक वस्तूंना मुभामालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपाच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची (दूध, भाजीपाला, फळे, खाद्यतेल, अन्नधान्य, औषधे) वाहतूक करण्यास मुभा असणार आहे़ राज्याच्या गृह विभागातील कार्यासन अधिकारी नि़ घिरटकर यांनी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे़ देशव्यापी चक्काजाम आंदोलनादरम्यान शहरातील एकाही ट्रकमध्ये माल भरला जाणार नाही वा वाहतूक केली जाणार नाही़ सोमवारी सकाळी दहा वाजता आडगाव ट्रक टर्मिनस येथे सर्व मालवाहतूक संघटनांचे पदाधिकारी व मालक एकत्र येणार असून केंद्र सरकारचा निषेध नोंदविणार आहे़
- अंजू सिंगल, अध्यक्ष,
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन