वादळी पावसाने कारले बाग जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:09 PM2020-06-04T21:09:47+5:302020-06-05T00:23:58+5:30

लासलगाव : दोन दिवासांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Carly garden landlord with torrential rain | वादळी पावसाने कारले बाग जमीनदोस्त

वादळी पावसाने कारले बाग जमीनदोस्त

Next

लासलगाव : दोन दिवासांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी घाम गाळून चार पैसे मिळतील या हेतूने घेतलेली हातातोंडाशी आलेले कारल्याचे पीक वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतमालाच्या काढणीच्या हंगामातच वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालिदल झाले आहेत. शेतीपिकांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले असल्याने शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. या वादळी वार्याच्या पावसामुळे ब्राम्हणगाव विंचूर येथील शेतकरी भास्कर गवळी यांचे दोन एकर कारले बाग जमीनदोस्त झाल्याने सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. त्यातून सावरण्यासाठी शासनाने पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.

Web Title: Carly garden landlord with torrential rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक