जिल्ह्यात काेरोना जनजागृती महाअभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:17 AM2021-02-16T04:17:27+5:302021-02-16T04:17:27+5:30
नाशिक : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबरोबरच कोविड लसीकरणाबाबत लाेकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यात सोमवारपासून जनजागृती ...
नाशिक : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबरोबरच कोविड लसीकरणाबाबत लाेकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यात सोमवारपासून जनजागृती मेाहीम सुरू करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या मोहिमेचा प्रारंभ केला.
नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयापासून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. केंद्र सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोच्या वतीने आयोजित कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती महाअभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उपायुक्त गोरख गाडीलकर, प्रवीणकुमार देवरे, प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदले, आदी उपस्थित होते.
यावेळी गमे म्हणाले, कोविड लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यावर आणि शासनाने ठरविलेल्या प्राधान्यक्रमानुसार लसीकरणात सहभाग वाढवून लोकांना प्रेरित करण्यासाठी या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे. कोरोनाच्या काळात आत्मनिर्भर भारत अभियान मोठ्या जोमाने उभे राहिले. आधीच्या तुलनेत भारतनिर्मित वस्तूंच्या उत्पादन आणि वापरात मोठी भर पडली आहे. याबाबतदेखील या जनजागृती अभियानामार्फत जनजागृती करण्यात येणार असल्याचे गमे यांनी सांगितले.
गतवर्षी लॉकडाऊन काळात प्रादेशिक आणि क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरोतर्फे ऑटोरिक्षा आणि मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत या महाअभियानाचे आयोजन करण्यात आले असून, या अभियानांतर्गत एक विशेष जनजागृती रथाच्या माध्यमातून कोविड लसीकरण, तसेच आत्मनिर्भर भारतविषयी लोकशाहीर पथक, तसेच ध्वनिफीत व चित्रीकरण संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागृती रथ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदले यांनी दिली.
(फोटो:१५: केारोना जनजागृती)
===Photopath===
150221\15nsk_51_15022021_13.jpg
===Caption===
केारोना जनाजागृती अभियानांतर्गत कला पथकाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे कलावंत.