पहिली लाट राेखलेल्या गावांमध्ये काेरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:25+5:302021-04-30T04:17:25+5:30

नांदगाव तालुका : बेफिकिरी व फाजील आत्मविश्वास नडला नांदगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा कालावधी फेब्रुवारी २०२१ पर्यंत गृहीत धरण्यात ...

Carona infiltration in the villages where the first wave was observed | पहिली लाट राेखलेल्या गावांमध्ये काेरोनाचा शिरकाव

पहिली लाट राेखलेल्या गावांमध्ये काेरोनाचा शिरकाव

Next

नांदगाव तालुका : बेफिकिरी व फाजील आत्मविश्वास नडला

नांदगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा कालावधी फेब्रुवारी २०२१ पर्यंत गृहीत धरण्यात आला. पहिल्या लाटेतील कोरोना तालुक्यात बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पोहोचला होता. या लाटेत २४ गावे संक्रमणापासून दूर राहिली होती. त्यावेळी कोरोनाविषयी समाजात निर्माण झालेल्या दहशतीमुळे बहुसंख्य गावांनी बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींना गावबंदी केली. बाधितांना अक्षरश: वाळीत टाकले गेले. त्यामुळे कोरोनाचा आलेख २०२० च्या शेवटापर्यंत कमी होत गेला. प्रमाण कमी होत गेले तसे लोक अधिक बिनधास्त होत गेले. मात्र, आता पहिल्या लाटेपासून दूर राहिलेली गावे दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत.

दुसऱ्या लाटेची सुरुवातच बेफिकिरी व फाजील आत्मविश्वासाने झाली. दरम्यान, कोरोना विषाणूत जनुकीय बदल झाल्याने तो अधिक जीवघेणा होऊन प्रचंड वेगाने पसरू लागला. १० मार्चच्या दरम्यान दुसरी लाट सुरू झाली. लक्षणविरहीत प्रादुर्भावाने बाधित अंधारात राहिले. या लाटेच्या अंडरकरंटची गती व त्याची व्याप्ती लक्षात येईपर्यंत पहिल्या लाटेत न सापडलेल्या गावात तो पोहोचला. यामुळे आपल्याला काहीच होत नाही हा अनेक गावांचा भ्रम तुटून ती गावे कोरोनाच्या भोवऱ्यात सापडली. तालुक्यात कोरोनाची दुसरी अधिकृत लाट १० मार्चपासून सुरू झाली. तालुक्यात ८८ गावे असून, आजमितीस २५ गावांत कोरोना रुग्ण नाहीत.

इन्फो

७० टक्के गावांत कोरोनाचा शिरकाव

तालुक्याच्या ग्रामीण भागात ७० टक्के गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून, सध्या ३३३ रुग्ण उपचार घेत आहेत. गावोगावी असलेली रुग्णसंख्या कंसात दिली आहे. बोलठाण (१९), लोढरे (२), जातेगाव (७), कासारी (२०), जळगाव बु. (१०), ढेकू खु. (८), तळवाडे (१२), सावरगाव (२०), वेहेळगाव (३), बोराळे (१), मंगळाने (१), साकोरा (१३), कळमदरी (२१), जामदरी (१), मूळडोंगरी (५), नायडोंगरी (१३), परधाडी (४), हिंगणे (६), हिसवळ बु (११), हिसवळ खु, (८), मांडवड (२), भार्डी (६), वंजारवाडी (२), धोटाणे बु. (३), पांझणदेव (१), वाखारी (१), नांदूर (३), धोटाणे खु. (४), शास्त्रीनगर (१), हिरेनगर (२), पिंपरखेड (२५), चिंचविहीर (१), जळगाव खु. (१३), क्रांतीनगर (४), गंगाधरी (५), तांदूळवाडी (२), खिर्डी (१), वडाळी बु. (१), दहेगाव (२), गोंडेगाव (१), रोहिले (२), माणिकपुंज (३), कुसुमतेल (१), जातेगाव (चंदनपुरी) (१४), जातेगाव (वसंतनगर) (१), कसाबखेडा (३), रणखेडा (२), बिरोले (१), भालूर (४), लोहशिंगवे (८), बेजगाव (२), एकवई (१), मांडवड (आझादनगर) (१), खादगाव (३), धनेर (१), कोंढार (४), भारडी (३), बाणगाव खु. (१), चांदोरे (२), श्रीरामनगर (६), भौरी (२), मोरझर (२).

इन्फो

दुसऱ्या लाटेचा विळखा

फेब्रुवारी २०२१पर्यंत जवळकी, रोहिले, लोढरेवाडी, चंदनपुरी, वसंतनगर, ढेकू खु., कुसुमतेल, कसाबखेडा, पोही, इंदिरानगर, गणेशनगर, न्यू पांझण, मळगाव, फुलेनगर, न्यायडोंगरी, परधाडी, पिंप्री, बिरोळा, हिंगणे, रणखेडा, तांबेवाडी, जतपुरा, धनेर, बेजगाव या गावात एकही कोरोना रुग्ण नव्हता. यातली काही गावे दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडली आहेत. त्यासाठी प्रामुख्याने तीन कारणे पुढे येतात. साखर कारखान्यावरून गावाकडे आलेली मंडळी, शहरात कामधंदा किंवा इतर कामांसाठी जाऊन गावाकडे आलेली व्यक्ती व ग्रामीण भागातले घरी होणारे किंवा सार्वजनिक स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम.

कोट.....

कोरोनाच्या नियमावलीप्रमाणे गावात नियम पाळण्यासाठी लोकांची मानसिकता तयार केली. परंतु कामानिमित्त, दवाखान्यासाठी चाळीसगावकडे जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामाध्यमातून गावात कोरोना आला.

- तुळशीराम चव्हाण, सरपंच, कसाबखेडा

कोट....

शेतीची अवजारे, बी-बियाणे, खते इत्यादी शेतोपयोगी साहित्य आणण्यासाठी नांदगाव, नायडोंगरी अशा गावांना जावे लागते, खडी फोडण्यासाठी बाहेरगावी जाणार वर्ग आहे. तिथून कोरोना गावात आला.

- साहेबराव कट्यारे, सरपंच, चिंचविहीर

कोट....

पहिल्या लाटेत बाहेरच्यांसाठी गावबंदी केली होती. गावात दूध-दुभत्याचा व्यवसाय मोठा आहे. येथील दूध दुसऱ्या तालुक्यात जाते. येथला खवा प्रसिद्ध आहे. विक्रीसाठी बाहेरगावी जावे लागते. कांदा, मिरची पिकते. ते विकण्यासाठी बोलठाणला जावे लागते.

- संदीप जगताप, सरपंच, कुसुमतेल

---------------------------

ग्राफसाठी

तालुक्यातील एकूण गावे - ८८

सध्या कोरोना रुग्ण असलेली गावे - ६३

कोरोनामुक्त गावे- २५

Web Title: Carona infiltration in the villages where the first wave was observed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.