सटाणा इनरव्हिल क्लबच्या वतीने काेरोना योद्धे सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:10+5:302021-09-10T04:19:10+5:30
प्रमुख पाहुण्या म्हणून सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव होत्या. प्रास्ताविक साधना पाटील यांनी केले. या कार्यक्रमात एका गरजू महिलेला ...
प्रमुख पाहुण्या म्हणून सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव होत्या. प्रास्ताविक साधना पाटील यांनी केले. या कार्यक्रमात एका गरजू महिलेला रुपाली जाधव यांनी शिलाई मशीन भेट दिले. जि.प. शाळा भऊर येथील विद्यार्थ्यांना पूजा दंडगव्हाळ यांच्यामार्फत शालेय साहित्य देण्यात आले. ॲड. सरोज चंदात्रे यांनी महिलांना रेन वॉटर हार्वेस्टिंगविषयी तर डाॅ. विद्या सोनवणे यांनी योगा आणि आरोग्यविषयी माहिती दिली.
अंगणवाडीसेविका
सरला वाघ,
आश्विनी थोरात,
सरला वाघ, मीनाक्षी जाधव, सरिता सोनवणे,
उज्ज्वला सोनवणे, नीता भावसार,
संगीता भामरे,
अंगणवाडी मदतनीस सीमा बच्छाव,
वैशाली आहिरे,
सुनिता आहिरे, जयश्री भामरे तसेच कोरोना योद्धा म्हणून रेखा जाधव, कल्पना जाधव, जयश्री गुंजाळ, संध्या धोत्रे, रत्नमाला पवार, वैशाली पवार, रंजिता मोरे
आदींचा सन्मान करण्यात आला.
आभार प्रदर्शन रेखा वाघ यांनी तर सूत्रसंचालन रुपाली जाधव, मीनाक्षी जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष रुपाली कोठावदे, सुजाता पाठक, सरला अमृतकर, सूचिता सोनवणे, स्वाती सोनवणे आदी उपस्थित होते.