सुतारांचा नेहाही थांबला, जगण्याचा गुंता वाढला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:15+5:302021-06-03T04:11:15+5:30
सुतार व्यावसायिकांनी बदलत्या परिस्थितीत व्यवसायात बदल केला असून, लाकडी कामाऐवजी लोखंडी कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वीच्या लाकडी अवजारांची ...
सुतार व्यावसायिकांनी बदलत्या परिस्थितीत व्यवसायात बदल केला असून, लाकडी कामाऐवजी लोखंडी कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वीच्या लाकडी अवजारांची जागा लोखंडी अवजारांनी घेतली आहे. एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतीची अवजारे, कांदाचाळ, घराची दुरुस्तीची कामे सुरू असतात. पण जागतिक कोरोना महामारीमुळे सुतारकाम व्यावसायिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सुतारकाम या कारागिराबरोबरच लोहार, चांभार, ओतारी, अस्वले, माकडवाले, पोतराज या ग्रामीण भारताला हातभार लावणाऱ्यांबरोबर जोशी वासुदेव, पांगूळ या घटकांमध्येही रोजगाराअभावी अस्वस्थता आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा या विवंचना वाढल्या आहेत. त्यामुळे मिळेल ते आणि पडेल ते काम करण्याची तयारी या व्यावसायिकांकडून केली जात आहे.
कोट....
पूर्वी प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे बैलजोडी असायची, त्यामुळे लाकडी औजारांना मागणी असायची. पण आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने लोखंडी औजारांना मागणी वाढली आहे. त्यामुळे लाकडी औजारे हद्दपार झाल्यात जमा आहे. यावर्षी कोरोनामुळे ऐन सिझनमध्ये औजारे, कांदाचाळ, घरांच्या खिडक्या, दरवाजे बनविण्याच्या मटेरियलची कमतरता भासल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. सध्या दरवाजे, खिडक्या यांची असलेली दुरुस्ती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.
- संतोष राजगुरू, सुतार व्यावसायिक
फोटो- ०२ जळगाव नेऊर मशीन
===Photopath===
020621\02nsk_25_02062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०२ जळगाव नेऊर मशिन