घंटागाडी ठेकेदाराची उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:00 AM2018-01-03T01:00:06+5:302018-01-03T01:01:55+5:30

नाशिक : महापालिकेने पंचवटी व सिडको विभागातील घंटागाडी ठेकेदाराकडून वसूल केलेला सुमारे पावणे दोन कोटींचा दंड आणि त्यानंतर प्रशासनाने ठेका रद्द करण्यासंबंधीची बजावलेली नोटीस याविरोधात ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

The carpet contractor runs in the High Court | घंटागाडी ठेकेदाराची उच्च न्यायालयात धाव

घंटागाडी ठेकेदाराची उच्च न्यायालयात धाव

googlenewsNext
ठळक मुद्देघंटागाडी ठेकेदाराकडून वसूल केलेला सुमारे पावणे दोन कोटींचा दंडप्रशासनाने ठेका रद्द करण्यासंबंधीची बजावलेली नोटीस

नाशिक : महापालिकेने पंचवटी व सिडको विभागातील घंटागाडी ठेकेदाराकडून वसूल केलेला सुमारे पावणे दोन कोटींचा दंड आणि त्यानंतर प्रशासनाने ठेका रद्द करण्यासंबंधीची बजावलेली नोटीस याविरोधात ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये महापालिकेने नव्याने घंटागाडीचा ठेका दिला. त्यात पंचवटी व सिडको विभागातील ठेकेदाराबाबत सर्वाधिक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे महापालिकेने सदर ठेकेदाराला सुमारे पावणे दोन कोटींचा दंड ठोठावत तो त्याच्या अनामत रकमेतून वसूल केला. याशिवाय, नगरसेवकांच्या तक्रारीनंतर सदर ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासंबंधीचीही नोटीस बजावण्यात आलेली आहे.

Web Title: The carpet contractor runs in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.