पदपथावर गाजरगवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:50 PM2020-09-07T23:50:42+5:302020-09-08T01:26:01+5:30
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते पांडवनगरी बसथांब्यापर्यंत रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या पदपथावर गाजरगवत वाढल्याने पदपथ गवतात हरवले असून, त्यामुळे पादचाऱ्यांना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

वडाळ नाका ते पाथर्डी चौफुली या वडाळा -पाथर्डी रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात येऊन दोन टप्प्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्यात शोभिवंत झाडे लावण्यात आली होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आले आहे. या रस्त्यालगत विविध उपनगरे, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय असल्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते; परंतु सराफनगर ते पांडवनगरी बसथांबा, वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणात गाजरगवत आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
त्यामुळे सकाळी व सायंकाळी इंदिरानगर, पांडवनगरी, सराफनगर, सार्थकनगर, शरयूनगरीसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती फेरफटका मारण्यासाठी येतात; परंतु पदपथाभोवती गाजरगवत वाढल्याने पादचाºयांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.