वाहून जाणारी वाहने वाचविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:32 PM2020-06-12T22:32:08+5:302020-06-13T00:10:21+5:30

नाशिक : शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीचे पात्र दुपारीच ओसंडून वाहू लागले. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवरील मोकळ्या जागेत लावण्यात आलेली काही वाहने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या.

Carrying vehicles rescued | वाहून जाणारी वाहने वाचविली

वाहून जाणारी वाहने वाचविली

Next

नाशिक : शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीचे पात्र दुपारीच ओसंडून वाहू लागले. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवरील मोकळ्या जागेत लावण्यात आलेली काही वाहने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या. मात्र, नदीकाठावरील कार्यकर्त्यांनी हिंमतीने त्यातील सात वाहने वाहून
जाण्यापासून वाचविल्या.
सकाळपासूनच पावसाचे वातावरण असले तरी तुफान पाऊस कोसळण्याचा अंदाज नव्हता. त्यामुळे गोदाकाठावर नियमितपणे पार्किंगला लावलेल्या वाहनांपैकी काही वाहने पाण्याच्या प्रवाहात येऊ लागले. वाहनमालकांच्या आणि परिसरातील युवा कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यातील तरबेजपणे पोहता येणाऱ्या काही युवकांनी या वाहनांना पाण्याच्या प्रवाहातून उलट दिशेला ओढून नेत सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे काठावरील वाहने वाचू शकले. त्याआधी पाऊस वाढू लागल्याचे दिसताच काठावरील टपरीचालक आणि दुकानदारांनी दुपारीच आवरासावर करून घेण्यास प्रारंभ केला होता.

 

Web Title: Carrying vehicles rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक