सिग्नल तोडून कारची बसला धडक

By admin | Published: July 1, 2017 12:13 AM2017-07-01T00:13:33+5:302017-07-01T00:13:33+5:30

तारवालानगर चौफुली ; सुदैवाने जीवितहानी नाही़

The car's bus fell off the signal and hit it | सिग्नल तोडून कारची बसला धडक

सिग्नल तोडून कारची बसला धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भरधाव कारने सिग्नल तोडून बसला धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३०) दुपारच्या सुमारास तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी मार्केट यार्डकडून फोर्ड इको स्पोर्ट कारचालक (एमएच १५, एफजी ३३६६) सचिन अरविंद दराडे (३४, रा़ दराडे मळा, मनमाड) हे भरधाव कार घेऊन अमृतधामकडे जात होते़ त्यावेळी तारवाला चौफुलीवरील सिग्नल कारने तोडला व म्हसरूळकडून निमाणीकडे जाणारी शहर बस (एमएच २०, बीएल ४१८६) जात असताना कार बसवर जाऊन आदळली़ यामध्ये कारचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कारचालक दराडे (३४, रा़ दराडे मळा, मनमाड) विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The car's bus fell off the signal and hit it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.