फसवणूक प्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:51 AM2018-10-15T00:51:10+5:302018-10-15T00:52:32+5:30
नाशिकरोडच्या आजी-माजी नगरसेवकांसह दोघा संशयितांनी मूळ मालकाची परवानगी न घेताच जमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दिनकर गोटीराम आढाव (५८, रा. नारायणबापूनगर, जेलरोड), पवन चंद्रकांत पवार (रा़ जेलरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी नगरसेवकांची नावे आहेत़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : नाशिकरोडच्या आजी-माजी नगरसेवकांसह दोघा संशयितांनी मूळ मालकाची परवानगी न घेताच जमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दिनकर गोटीराम आढाव (५८, रा. नारायणबापूनगर, जेलरोड), पवन चंद्रकांत पवार (रा़ जेलरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी नगरसेवकांची नावे आहेत़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कॅनॉलरोड परिसरातील रहिवासी एस़ बी़ गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नगरसेवक दिनकर आढाव, माजी नगरसेवक पवन पवार, विलासराज मोहन गायकवाड (४५, रा. पिंपळपट्टी दसक), दीपक विष्णू सदाकळे (४२, रा. नाशिकरोड) यांनी महापालिका हद्दीतील सर्व्हे नंबर ७९ / १७ मधील जमिनीची गुंठेवारी पद्धतीने परस्पर विक्री केली. ७ ते ८ वर्षांपूर्वी संशयितांनी हा प्रकार केला असून, या ठिकाणी आता पक्की घरे बांधून नागरिक राहण्यासही आले आहेत.
सदर प्रकार गांगुर्डे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत चौघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.