‘त्या’ कंपनी व्यवस्थापनाविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 09:32 PM2020-07-29T21:32:13+5:302020-07-30T01:52:49+5:30
दिंडोरी : तालुक्यातील पालखेड एमआयडीसी तील पीपीई किट व औषध निर्माण कंपनीत कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत सदर कंपनीच्या व्यवस्थापणाविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी पालखेड एमआयडीसी मधील कामगारांना कोरोना संसर्ग वाढलेल्या औषध निर्मिती कंपनी बाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात कंपनीत २४ जुलैला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला, मात्र कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या बसमध्ये तसेच प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी सोशयल डिस्टन्सचे पालन केले नाही. परिणामी ४४ कामगार बाधित झाले. शासनाच्या नियमांचे पालन न केल्याने संक्र मण वाढण्यास जबाबदार धरत दोन मॅनेजर व जबाबदार व्यवस्थापनाविरोधात साथ रोग प्रतिबंध,कोव्हिड १९ उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उप निरीक्षक अरु ण आव्हाड,पोलिस कॉन्स्टेबल युवराज खांडवी करीत आहेत.