लॉकडाऊन केल्यास उद्योगक्षेत्र कोलमडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:22 PM2020-07-18T22:22:17+5:302020-07-19T00:37:24+5:30

सातपूर : शहरात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेणे अपेक्षित आहे. कोरोनावर मात करण्यासाठी संयम पाळावा, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी यासारख्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

In case of lockdown, the industry sector will collapse | लॉकडाऊन केल्यास उद्योगक्षेत्र कोलमडेल

लॉकडाऊन केल्यास उद्योगक्षेत्र कोलमडेल

Next

सातपूर : शहरात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेणे अपेक्षित आहे. कोरोनावर मात करण्यासाठी संयम पाळावा, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी यासारख्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत औद्योगिक संघटनांच्या अध्यक्षांशी चर्चा केली असता त्यांनी लॉकडाऊनची संकल्पना फेटाळून लावली आहे. लॉकडाऊन केल्यास अर्थचक्राची गती पूर्णपणे मंदावणार आहे. कसेबसे सुरू झालेले उद्योग क्षेत्र कोलमडून पडेल. असे मत व्यक्त केले आहे.
----------------
लॉकडाऊनच्या प्रक्रियेतून उद्योग सावरू लागले आहेत. अजूनही लघुउद्योगांना काम मिळत नाही. कर्जाचे हप्ते आणि व्याज कसे फेडावे या गर्तेत उद्योजक आहेत. अनेक ठिकाणी अजूनही कामगारांना काम मिळालेले नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचा विचार करणे सुद्धा चुकीचे आहे. आर्थिक रोटेशन सुरू झाले आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास चोºया, लूटमार वाढेल. - वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा
लॉकडाऊन केल्यास उद्योग क्षेत्राला मोठी किंमत मोजावी लागेल. सद्यस्थितीत आहे त्या मनुष्यबळाचा वापर करून उत्पादन केले जात आहे. कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अर्थचक्राला गती मिळू लागली आहे. कायम प्रक्रिया उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात. उद्योग बंद पडतील. कामगार बेरोजगार होतील.
- शशिकांत जाधव, अध्यक्ष, निमा
लॉकडाऊन हा एकमेव पर्याय होऊ शकत नाही. तसे केल्यास गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. कामगार तंटे वाढतील. बँकांनी व्याज माफ केलेले नाही. फक्त स्थगिती दिली आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळण्याऐवजी ठप्प होईल.
- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष, उद्योग आघाडी
लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. लॉकडाऊन केल्यास अर्थचक्र शून्यावर येईल. आर्थिक घडी बसायला खूप वेळ लागेल. उद्योजकांना आता कुठे आॅर्डर्स मिळू लागल्या आहेत. अजूनही लघुउद्योग धडपड करीत आहेत. कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार यासाठी काम शोधत
आहेत. त्यात पुन्हा लॉकडाऊन केल्यास उद्योग बंद पडतील. शहराची अर्थव्यवस्थादेखील ठप्प होईल.
- विवेक कुलकर्णी, अध्यक्ष, लघुउद्योग भारती

Web Title: In case of lockdown, the industry sector will collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक