विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी

By admin | Published: August 27, 2016 12:12 AM2016-08-27T00:12:32+5:302016-08-27T00:12:40+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फणसवाडा परिसरातील घटना

In the case of molestation case, | विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी

विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी

Next

नाशिक : महाविद्यालयीन परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीस रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणारा आरोपी गोटीराम पंढरीनाथ शेवरे (रा़ खखळ, ता़ त्र्यंबकेश्वर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी शुक्रवारी (दि़ २६) दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ याप्रकरणी ४ सप्टेंबर २०१४ रोजी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फणसवाडा परिसरातील युवतीची महाविद्यालयात परीक्षा सुरू होती़ नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता़ या खटल्यात सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी सहा साक्षीदार तपासून न्यायालयात शेवरेविरुद्ध सबळ पुरावे सादर केले़. या पुराव्यानुसार न्यायाधीश फलके यांनी आरोपी शेवरे यास ३५४-अ (विनयभंग) कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी तीन महिने कारावास व ३५४-ड (विनयभंग) या कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)

Web Title: In the case of molestation case,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.