पाइपलाइन फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: September 10, 2014 10:22 PM2014-09-10T22:22:27+5:302014-09-11T00:17:12+5:30
पाइपलाइन फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
न्यायडोंगरी : येथे पिकांना पाणी-पुरवठा करणारी पाइपलाइन फोडल्या प्रकरणी नांदगाव न्यायालयाच्या आदेशावरून येथील तीन जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
न्यायडोंगरी येथील शेतकरी गोरख नरहरी बारी यांनी, शेतात हातगाव धरण क्रमांक २ येथून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केलेला होता. परंतु न्यायडोंगरी येथील निंबा भीमलाल शेलार, सतीश गंगाधर अहेर, अनिल गंगाधर अहेर यांनी सदरची पाइपलाइन फोडल्याने गोरख बारी यांनी पोलिसाकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने बारी यांनी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने नांदगाव पोलिसांना फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीसात ४२६, ४२७, ४३०, १०९ व ३४ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक एस.आर. ढोंबे हवालदार कडभाने करीत आहे.