संशय येताच चाचणी अन् त्वरित उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:54+5:302021-05-05T04:22:54+5:30

नाशिक : दिवसागणिक कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोेग्य व्यवस्था अपुरीच पडणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना होऊच नये, यासाठी दक्षता ...

In case of suspicion, test and immediate treatment | संशय येताच चाचणी अन् त्वरित उपचार

संशय येताच चाचणी अन् त्वरित उपचार

googlenewsNext

नाशिक : दिवसागणिक कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोेग्य व्यवस्था अपुरीच पडणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना होऊच नये, यासाठी दक्षता घेण्याची सर्वाधिक गरज आहे, तसेच यदाकदाचित तापासह अन्य कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी, अहवाल मिळण्यापूर्वी विलगीकरण आणि बाधित आढळल्यास डॉक्टरांकडून ताबडतोब उपचार करून घेण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.

कोरोनाच्या प्रारंभापासून सांगण्यात येत असलेली दक्षता सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स हेच सर्वाधिक प्रभावी सूत्र आहे. त्यातही योग्य मास्कचा वापर सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कुणाशीही बोलताना किंवा आपल्या आसपास व्यक्ती असताना तर मास्क बंधनकारकच मानणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती हा कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापली दक्षता घेणे हाच कोरोनापासून वाचण्याचा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे.

इन्फो

नवीन लाटेत ताप केवळ एकच दिवस येत असल्याने तत्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून खातरजमा करून घेण्यास प्राधान्य द्यावे, तसेच चाचणीला जाऊन आल्यानंतर अहवाल मिळेपर्यंतदेखील विलगीकरणात राहिल्यास घरचे बाधित होत नाहीत. केवळ आणि केवळ अत्यावश्यक, जीवनावश्यक काम असेल तरच कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडावे. अन्यथा घराबाहेर न पडणे हाच कोरोनापासून दूर राहण्याचा उपाय आहे.

फोटो

०३डॉ. कपिल आहेर

Web Title: In case of suspicion, test and immediate treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.