आठ अवैध भंगार व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:51 AM2018-07-31T00:51:05+5:302018-07-31T00:51:21+5:30

सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

Cases filed against eight illegal scam professionals | आठ अवैध भंगार व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल

आठ अवैध भंगार व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल

Next

सिडको : सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत़  अंबड लिंकरोड परिसरातील बहुचर्चित भंगार मार्केट महापालिकेने उठविल्यानंतर व्यापाºयांनी परवाना घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. या भागात पुन्हा भंगार खरेदी केले जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. तसेच या भागात गुन्हेगारी वाढत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाणे, सातपूर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची पाच ते सहा पथके तयार करण्यात आली होती़
संजीवनगर, अंबड लिंकरोड परिसरातील भंगार मार्केट परिसरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये पोलिसांनी भंगार व्यावसायिकांचे परवाने तपासले़ तसेच खरेद ी केलेल्या भंगार मालाच्या पावत्यांची तपासणी केली़ यावेळी परवाना नसलेल्या भंगार मालाचा व्यवसाय करणाºया आठ व्यापाºयांकडून सुमारे पाचशे किलो विनापावती खरेदी केलेले भंगार माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्यात आठ भंगार व्यवसाय करणाºया व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली़

Web Title: Cases filed against eight illegal scam professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.