सुमारे साडे सात लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:49 PM2019-12-07T18:49:33+5:302019-12-07T18:50:14+5:30

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आप्पा यशवंत जगताप यांच्या राहत्या घरावरील टेरेसवरील दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून सुमारे सात लाख त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

With a cash of about seven and a half lakhs, the thieves spread | सुमारे साडे सात लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार

लोहोणेर येथील शेतकरी आप्पा जगताप यांच्या घरातील याच कोठीतुन चोरट्यांनी रोकड लंपास केली.

Next
ठळक मुद्दे कोठीचे कुलूप तोडून सुमारे सात लाख, त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केला.

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आप्पा यशवंत जगताप यांच्या राहत्या घरावरील टेरेसवरील दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून सुमारे सात लाख त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर येथील शेतकरी आप्पा यशवंत जगताप हे कोळी वाड्यात वास्तव्यास आहेत काल मध्य रात्रीच्या सुमारास जगताप यांच्या घरावरील टेरेसचा लाकडी दरवाजा तोडून आतील कडी उघडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व किचन रूम मध्ये असलेल्या कोठीचे कुलूप तोडून सुमारे सात लाख, त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केला.
यावेळी आप्पा जगताप हे जागे झालेने झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात खबर मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे,व पोलीस निरीक्षक सुहास देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे के.के.पाटील,सहा. पोलीस निरीक्षक एस.ई. मातोंडकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले. तर काही वेळातच श्वान पथक बोलविण्यात आले असता त्याने कोळीवाडा- गुजरवाडा - सोसायटी आॅफिस- व परत कोळीवाडा असा माग दाखिवला.
या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी.एन. निकम हे पुढील तपास करीत आहे.
गेल्या दीड मिहन्या पूर्वीच लोहोणेर गावात सलग पाच ठिकाणी घरफोडीचा प्रकार घडला होता त्याच्या खुणा ताज्या असतानाच पुन्हा एकदा सदर प्रकार घडला असल्याने लोहोणेर गावातील नागरिकामध्ये घबराट निर्माण झाली आहे.

 

Web Title: With a cash of about seven and a half lakhs, the thieves spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.