शेतमाल विक्र ीचे पैसे १ जूनपासून रोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:02 AM2018-05-07T01:02:45+5:302018-05-07T01:02:45+5:30

उमराणे : 30 मे पर्यंत थकीत शेतकºयांचे पैसे मिळणारशेतमाल विक्र ीचे पैसे १ जूनपासून रोख उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन धनादेश न वटणे व इतर कारणांमुळे कांदा उत्पादक शेतकºयांची व्यापाºयांकडील थकीत रक्कम ३० मे पर्यंत देण्यात येणार असून, १ जूनपासून मालविक्रीचे पैसे रोख स्वरूपात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Cash for commodity sales will start from June 1 | शेतमाल विक्र ीचे पैसे १ जूनपासून रोख

शेतमाल विक्र ीचे पैसे १ जूनपासून रोख

Next
ठळक मुद्दे उमराणे : 30 मे पर्यंत थकीत शेतकºयांचे पैसे मिळणारठरावीक व्यापाºयांकडे शेतकºयांचे १ कोटी २८ लाख घेणे बाकी

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन धनादेश न वटणे व इतर कारणांमुळे कांदा उत्पादक शेतकºयांची व्यापाºयांकडील थकीत रक्कम ३० मे पर्यंत देण्यात येणार असून, १ जूनपासून मालविक्रीचे पैसे रोख स्वरूपात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून उमराणे बाजार समितीत शेतमाल विक्र ीचे पैसे धनादेशाद्वारे देण्यात येत होते; परंतु बहुतांश व्यापाºयांकडील धनादेश न वटता परत येत असल्याने व इतर कारणांमुळे शेतकºयांचे १३ कोटी रु पये थकले होते. बाजार समितीने संबंधित व्यापाºयांकडे वारंवार तगादा लावून शेतकºयांचे ११ कोटी ७२ लाख रु पये टप्प्याटप्प्याने चुकते करण्यास भाग पाडले होते. आजमितीस येथील ठरावीक व्यापाºयांकडे शेतकºयांचे १ कोटी २८ लाख घेणे बाकी आहे. या व्यापाºयांना 30 मे च्या आत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून, पैसे न दिल्यास जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरण समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच १ जूनपासून बॅँकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध झाल्यास मालविक्रीचे पैसे रोखीने देण्यात येणार असून, अडचण आल्यास आरटीजीएस व एनएफटीद्वारे चोवीस तासाच्या आत संबंधित मालविक्र ी करणाºया शेतकºयांच्या बॅँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. दरम्यान, थकीत शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार होते; परंतु ३० मे च्या आत थकीत शेतकºयांना पैसे देण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याचे प्रहारचे देवळा तालुकाध्यक्ष संजय देवरे व कार्यकर्त्यांनी जाहीर केले.
बैठकीस देवळा तालुका सहायक निबंधक संजय गिते, बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, उपसभापती महेंद्र पाटील, संचालक मंडळ, व्यापारी असो.चे अध्यक्ष खंडू पंडित देवरे तसेच समितीचे सचिव नितीन जाधव व शेतकरी बांधव उपस्थित होते.उमराणे बाजार समितीत माल विक्र ी केलेल्या शेतकरी बांधवांची थकीत रक्कम पूर्णपणे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून, गरज पडल्यास न्यायाधिकरण समितीचा आधार घेत व्यापाºयांकडून पैसे वसूल करून शेतकºयांना अदा करण्यात येतील.
- राजेंद्र देवरे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
येथे एकच राष्ट्रीयीकृत बॅँक असून, व तेथेही पैसे मिळण्यास मर्यादा असल्याने मालविक्र ीचे पैसे रोखीने देणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे शेतकरी हितावह निर्णय घेण्यासाठी व्यापाºयांना पैसे काढण्यासाठी मर्यादा वाढविणे गरजेचे आहे.
- संजय देवरे, कांदा व्यापारी

गेल्या काही दिवसांपासून कांदा व्यापारी अडचणीत सापडला असला तरीही ज्यांच्याकडे शेतकºयांचे पैसे देणे आहेत ते येत्या महिनाभरात देण्यात येणार असून, १ जूनपासून मालविक्र ीचे पैसे रोखीने देण्याचे व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ठरविण्यात आले.
- खंडू पंडित देवरे, अध्यक्ष, व्यापारी असो., उमराणे
येथील बाजार समितीचा नावलौकिक असून, मालविक्र ेत्या शेतकºयांचा विश्वास असल्यानेच इतर बाजार समित्यांच्या तुलनेत येथील बाजार समितीत काद्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु काही शेतकºयांना हाताशी धरु न राजकारण केले जात आहे.
- धर्मा देवरे, पंचायत समिती सदस्य

Web Title: Cash for commodity sales will start from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी