कॅश भरणाºयांनी केला ५६ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:14 AM2017-09-23T01:14:36+5:302017-09-23T01:14:40+5:30

एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम करणाºया कंपनीतील चौघा कर्मचाºयांनीच ५६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २२) दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर कोणीतरी पैशांची पेटीच पळवून नेल्याचा बनाव या चौघांनी रचला होता़ यामध्ये वाहनचालक गनमॅन व पैसे लोड करणाºया दोघांचा समावेश आहे़ दरम्यान, या चौघाही संशयितांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे़

Cash payment of 56 lakhs | कॅश भरणाºयांनी केला ५६ लाखांचा अपहार

कॅश भरणाºयांनी केला ५६ लाखांचा अपहार

Next

नाशिक : एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम करणाºया कंपनीतील चौघा कर्मचाºयांनीच ५६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २२) दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर कोणीतरी पैशांची पेटीच पळवून नेल्याचा बनाव या चौघांनी रचला होता़ यामध्ये वाहनचालक गनमॅन व पैसे लोड करणाºया दोघांचा समावेश आहे़ दरम्यान, या चौघाही संशयितांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे़ ‘एटीएम’मध्ये कॅश भरण्याचा ठेका घेतलेल्या सिक्युअर व्हॅल्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ब्रँच हेड गोरक्षनाथ पोपट डोंगरे (३१, रा़शिवशंकर सोसायटी, पाथरवट लेन, पंचवटी) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एटीएममध्ये पैसे भरणारे व्हॅनमधील (एमएच १२, केपी ८८३४) वरील संशयित अमोल दिलीप आवारे (मु़पो़ खेरवाडी, आवारे मळा, ता़जि़ नाशिक), पुष्कराज पुरणचंद जाधव (रा़ समतानगर, टाकळीनगर, नाशिक), वाहनचालक योगेश कृष्णा लगरे (रा़हेगडेवार चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको) व गनमॅन बंडू वामन जाधव (रा़वडाळीभोई, चांदवड, जि़ नाशिक) यांच्याकडे शुक्रवारी (दि़ २२) सकाळी तीन कोटी २६ लाख रुपये आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दिले होते़ या चौघांनी संगनमत करून यातील ५६ लाख रुपयांचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार करून कंपनीची फसवणूक केली़ रविवार कारंजा तसेच इतर दोन ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर सांगली बँक सिग्नलजवळील आयसीआय-सीआय एटीएमजवळ आल्यानंतर या चौघांनी व्हॅनमधील पैशाने भरलेली एक ट्रंक गहाळ झाल्याची ओरड करीत पोलिसांना माहिती दिली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली़ कंपनीचे शाखा व्यवस्थापक डोंगरे यांनी या चौघांविरोधात अपहाराची फिर्याद दिली.

Web Title: Cash payment of 56 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.