कॅशलेससाठी प्रशिक्षण

By admin | Published: January 4, 2017 12:15 AM2017-01-04T00:15:22+5:302017-01-04T00:15:40+5:30

जिल्हा बॅँक : ३०० ठिकाणी घेणार कार्यशाळा

Cashless training | कॅशलेससाठी प्रशिक्षण

कॅशलेससाठी प्रशिक्षण

Next

नाशिक : नाबार्डच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांनी त्यांच्या सर्व शाखांमध्ये कॅशलेस व्यवहार सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. नाबार्डच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमार्फत जिल्ह्यातील २१३ शाखांमध्ये जवळपास ३०० ठिकाणी या प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या प्रशिक्षणाचा शुभारंभ मंगळवारी (दि. ३) सुरगाणा तसेच इगतपुरी तालुक्यातून झाल्याचे समजते. सुरगाणा येथील तालुका ठिकाणी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेत कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट व मुख्य लेखा समन्वय विभागाचे अधिकारी दीपक अहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातही मंगळवारी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्णातील १५ तालुक्यांतून सुमारे ३०० ठिकाणी अशा प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन बॅँकेच्या सभासदांना व शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहारांसंदर्भात व बॅँकेने काढलेल्या रूपेकार्ड वापरासंदर्भात तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ३ ते १५ जानेवारीदरम्यान या ३०० प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पूर्वी किसान कार्डवर फक्त कर्ज काढता येत होते. आता त्याच्या पुढे जाऊन तयार करण्यात आलेल्या रूपेकार्डवर कर्जासोबतही खात्यावर रक्कम शिल्लक असल्यास ती काढण्याची सोय करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर आॅनलाइन बॅँकेचे व्यवहार कसे करावेत, एटीएम कार्डचा वापर कसा करावा यांसह अन्य बारीकसारीक गोष्टींची माहिती या ३०० प्रशिक्षण कार्यशाळेतून देण्यात येणार आहे. कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जिल्हा बॅँकेची वाटचाल या प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून सुरू झाल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cashless training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.