घोटी खुर्दच्या सरपंचांचे जातप्रमाणपत्र अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:51 PM2020-06-26T12:51:59+5:302020-06-26T12:52:34+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी गोडसे यांच्या विरोधात जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्र ार केली होती.
वर्षभरापासून अनेकदा झालेल्या सुनावण्यांद्वारे दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी देण्यात आली होती. नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने गोडसे यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या जातीचा दावा अवैध ठरविला. दरम्यान ह्या आदेशामुळे घोटी खुर्दच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना पदच्युत व्हावे लागणार आहे. थेट सरपंचपदावरच गंडांतर आल्याने पुन्हा निवडणुक होईल की सदस्यांमधून सरपंच निवडला जाईल याबाबत इगतपुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
----------------------------
घोटी खुर्द येथील मंदाकिनी गोडसे यांनी इतर मागास प्रवर्गातील हिंदू कुणबी जातीच्या दाखल्यावर थेट सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. गोडसे यांनी नामनिर्देशन पत्र भरताना कुणबी जातीचे नसतांना खोटे पुरावे, खोटे प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र सादर केले होते. याबाबत सूनावण्या होऊन नाशिकच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने गोडसे यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. गोडसे यांनी जात प्रमाणपत्र काढतांना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींच्या जातीच्या पुराव्यांचा गैरवापर केला होता. याबाबत तक्र ारदार माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी पुरावे सादर केले होते.
-----------------------------
प्रांताधिकाºयांची दिशाभूल करून गोडसे यांनी कुणबी जातीचा दाखला घेतला होता. यासह अर्थबळाच्या जोरावर जातीचे प्रमाणपत्र वैध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांना वेठीस धरले होते. मात्र त्यांचा खटाटोप समितीने व्यर्थ ठरवला. माझ्याकडील भक्कम पुराव्यांच्या बळावर न्यायदेवतेने गोडसे यांचे पितळ उघडे पाडले. हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे असे मी समजतो.
- आत्माराम फोकणे, तक्र ारदार