कास्ट्राइब संघटनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:24 AM2018-03-10T00:24:41+5:302018-03-10T00:24:41+5:30

नाशिक : मागासवर्गीय शासकीय कर्मचाºयांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

Castro movement of the Castro organization | कास्ट्राइब संघटनेचे धरणे आंदोलन

कास्ट्राइब संघटनेचे धरणे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे३० टक्के नोकर कपातीची घोषणा रद्द करावी कंत्राटी कर्मचाºयांना प्राधान्य द्यावे

नाशिक : मागासवर्गीय शासकीय कर्मचाºयांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, कंत्राटी, ठेकेदारी, रोजंदारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, एनएचएमअंतर्गत कार्यरत कर्मचारी संघटना सहभागी झाले होते. शासकीय सेवेतील ३० टक्के नोकर कपातीची घोषणा रद्द करावी, सरळसेवा भरती व पदोन्नतीतील चार लाख रिक्तपदांचा अनुशेष भरण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी, कंत्राटी कर्मचाºयांना सेवेत कायम करावे, शासन सेवा पुरवठा एजन्सी बंद करण्यात याव्यात, राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कर्मचाºयांना न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन लागू करावे, नोकर भरतीवरील बंदी उठविण्यात यावी, रिक्त पदे भरताना सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाºयांना प्राधान्य द्यावे, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम करण्यासाठी पुन्हा नव्याने कायद्यात तरतूद करावी आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात करुणासागर पगारे, उदय लोखंडे, भगवान बच्छाव, एकनाथ मोरे, गोविंद कटारे, अरविंद जगताप, रमेश जगताप, सुमन वाघ, नाना पटाईत, ताराचंद जाधव, आर. पी. अहिरे, जितेंद्र राठोड, रणजित पगारे, श्याम सोनवणे, रखमाजी सुपारे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Castro movement of the Castro organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप