मांजरपाड्याच्या पाण्याने दुष्काळ हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 09:34 PM2020-08-23T21:34:06+5:302020-08-24T00:17:45+5:30
येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम १९७२ ला सुरू झाले. ४० ते ४५ वर्षांनंतर २०१९ ला पूर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नात पुणेगाव ते दरसवाडी ६३ किमी आणि दरसवाडी ते बाळापूर ४२ किमी अशी १०५ किमी कालवा चाचणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांच्या तिसºया पिढीला पाणी पाहण्याचा योग आला. पाणी आले अन सतत दुष्काळी असा शिक्का असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी दसºयालाच दिवाळी साजरी केली.मांजरपाडा प्रकल्पाचे काम अपूर्ण असूनही बाळापूर पर्यंत पाणी आले होते. जून२०२० अखेर पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाणी डोंगरगाव पर्यंत जाईल असे नियोजित असताना दुर्दैवाने कोरोना संकटाने लॉकडाऊन सुरू झाला प्रकल्पाचे काम बंद पडले.
मांजरपाडा काम अपुर्ण असले तरी मागील वर्षा प्रमाणे निश्चितच पाणी येवला तालुक्यात पोहचेल असा विश्वास होता. मात्र मांजरपाडा, पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी या लाभ क्षेत्रात कमी पाऊस असल्याने पाणी येणार की नाही या चिंतेत शेतकरी होता. मात्र गेल्या ५दिवसापासून या लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणे चांगली भरली आहेत. त्यामुळे कालवा पुन्हा वाहणार अशी आशा निर्माण झाली आहे.लॉकडाऊन शिथिल होताच पुणेगाव ते बाळापूर पर्यंत कालवा दुरु स्ती, विस्तारीकरण, अडथळा दगड काढणे आदी कामे सुरू करण्यात आली होती. पुणेगाव ते दरसवाडी हे काम पूर्ण झाले असून दरसवाडी ते बाळापूर मधील काम अंतिम टप्प्यात आहे. विसापूर ते बाळापूर हे शेवटचे काम सुरू आहे. कालवा दुरु स्ती, रु ंदीकरण झाल्याने दरसवाडी येथून पाणी सुटल्यावर तीन दिवसात पाणी पोहचेल अशी अपेक्षा आहे.पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते बाळापूर कालवा दुरु स्ती झाली आहे. निसर्गकृपेने पाच-सहा दिवसापासून मांजरपाडा बोगदा चांगल्या क्षमतेने वाहतो आहे, पुणेगाव ५० टक्के भरले आहे. सुदैवाने पावसाने दरसवाडी ६० टक्के भरले आहे. मागील वर्षीप्रमाण यंदा निश्चितच पाणी येणार यात शंका नाही.
- मोहन शेलार, आंदोलक