बिबट्याचा घरात घुसून मांजरींचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:42 PM2018-10-25T17:42:06+5:302018-10-25T17:42:19+5:30

वरखेडा -लखमापुर ता .दिंडोरी येथील हनुमानवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर रामदास दळवी यांच्या स्वयंपाक घरात घुसून बिबट्याने दोन मांजरीचा फडशा पाडल्याने गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे .

Catcher enters into the house of a leopard | बिबट्याचा घरात घुसून मांजरींचा फडशा

बिबट्याचा घरात घुसून मांजरींचा फडशा

Next

वरखेडा -लखमापुर ता .दिंडोरी येथील हनुमानवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर रामदास दळवी यांच्या स्वयंपाक घरात घुसून बिबट्याने दोन मांजरीचा फडशा पाडल्याने गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे . ज्ञानेश्वर दळवी हे काल रात्री सर्व परिवारासह जेवण करीत होते . त्यांची वयोवृद्ध आर्इं बैठक घरात बसलेल्या होत्या .मोठया भावाचे जेवण आटोपून ते बाहेर गेले. कम्पाउन्डचा दरवाजा थोडा उघडा असल्याने याच संधीचा फायदा घेत बिबट्याने घरात प्रवेश केला . बिबट्या येत आहे .म्हणून आजीने घरातील माणसांना आवाज दिला परंतु आवाज अस्पष्ट आल्याने घरातील सर्व जेवणात मग्न असतांना बिबट्या थेट ते जेवत असलेल्या खोलीत गेला. तिथे लहान बालके पण खेळत होते .बिबट्यास पाहताच सर्वांची फजिती उडाली, सर्व खूप भेदरले होते .तिथे दोन मोठया मांजरी बसल्या होत्या बिबट्याने त्या मांजरावर हल्ला करून घेऊन गेला. सर्वजन अवाक नजरेने हल्ल्यांचे दृष्य पहात राहिले . बालके तर घाबरून गेली होती. वन विभागाचे तर शर्तीचे प्रयत्न झाले .पन त्यांना बिबट्या पकडण्यात अद्याप यश आले नाही .सर्वदूर बिबट्याची भीती जनतेत निर्माण झाली आहे . वनविभाग पण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे .या भागात कॅमरा पण कायम स्वरु पी लावलेला आहे .यात विविध प्राणी कॅमेरात कैद झालेले दिसतात. परंतु बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने वनविभागास अपयश येत आहे .

 

Web Title: Catcher enters into the house of a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ