स्थानकावर खानपान सेवाधारकांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:49 AM2018-09-21T00:49:32+5:302018-09-21T00:51:03+5:30
मनमाड : रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे स्थानकावरील खानपान सेवाधारकांनी संप केला आहे. या संपात सर्व स्टॉलधारक उतरल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळणे अवघड झाले आहे.
मनमाड : रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे स्थानकावरील खानपान सेवाधारकांनी संप केला आहे. या संपात सर्व स्टॉलधारक उतरल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळणे अवघड झाले आहे.
रेल्वेस्थानकावरील कॅन्टीनवर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारे गॅस सिलिंडर गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. त्या ऐवजी विद्युत शेगडी वापरण्याची तोंडी सूचना देण्यात आली असली तरी वीज मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील स्टॉलवर कुकिंग बंद असल्याने प्रवाशांना ताजे खाद्यपदार्थ देण्यास अडचण निर्माण झाली आहे. स्थानकावरील वेटर-वेंडरचे मेडिकल करण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर करून अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही रेल्वेचे अधिकारी मंजुरी देत नाही.स्टॉलवर फक्त रेल निल पाण्याची बाटली विकण्यास सक्ती केली जात आहे मात्र या पाण्याच्या बाटल्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेचे अधिकारी मनमानी करून त्रास देत आहेत. या कारभाराला कंटाळून आम्ही बेमुदत कॅन्टीग बंद आंदोलन सुरू केले असल्याचे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे कैटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शर्मा यांनी सांगितले.रेल्वेचे अधिकारी व स्टॉलधारक यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा फटका प्रवाशांना बसत असून त्यांना ताजे खाद्यपदार्थ मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत.