मांजामुळे पक्ष्यांवरील संक्रात कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:10+5:302021-01-08T04:42:10+5:30

बस स्थानके प्रवाशांनी गजबजली नाशिक : शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी शहरातील बस स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे ...

Cats perpetuate bird flu | मांजामुळे पक्ष्यांवरील संक्रात कायम

मांजामुळे पक्ष्यांवरील संक्रात कायम

Next

बस स्थानके प्रवाशांनी गजबजली

नाशिक : शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी शहरातील बस स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचीही बसेसला गर्दी झाली आहे. सध्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी कमी असल्याने बसेसला गर्दी वाढल्याचे दिसते. पुणे, धुळे आणि औरंगाबादला जाणाऱ्या बसेसलाही रविवारी गर्दी झाली होती.

गंगापूर रस्त्याचे अचानक डांबरीकरण

नाशिक : गंगापूर धरणाजवळील ग्रेपपार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी या मार्गावर डांबरीकरणाचे पॅच देण्यात आले. गंमतजम्मत कॉर्नरपासून ते धरणापर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडलेले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

बाजारात संत्र्यांची मोठी आवक

नाशिक: नाशिकच्या बाजारात संत्र्यांची मोठी आवक झाली आहे. फळ बाजारात, तसेच आठवडे बाजारामध्ये संत्री मेाठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्याचे दिसते. ४० ते ६० रुपये किलो दराने संत्री विकली जात आहे. फेरीवाल्यांकडील संत्र्यांचे भाव तर रोजच बदलत असल्याने ग्राहकांनाही स्वस्त संत्री मिळत आहे.

Web Title: Cats perpetuate bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.