५६ हजारांचा मांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:50 AM2021-01-09T01:50:02+5:302021-01-09T01:51:01+5:30
शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना वापरला जाणाऱ्या नायलॉन व काच असलेल्या मांजा विक्री करणाऱ्या मांजा विक्रेत्यांवर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट दोन पथकाने कारवाई करीत, अशा धोकादायक मांजाचे सुमारे ५६ हजार ४०० रुपये किमतीचे ८८ रीळ जप्त केले.
नाशिक : शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना वापरला जाणाऱ्या नायलॉन व काच असलेल्या मांजा विक्री करणाऱ्या मांजा विक्रेत्यांवर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट दोन पथकाने कारवाई करीत, अशा धोकादायक मांजाचे सुमारे ५६ हजार ४०० रुपये किमतीचे ८८ रीळ जप्त केले.
गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकातील पोलीस नाईक मोतीलाल महाजन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी कारवाई केली. या कारवाईत सिडकोतील शिवशक्ती चौकातून अमित उर्फ सनी बाळासाहेब दाभाडे (२९) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नायलॉन मांजाचे ४० हजार २०० रुपये किमतीचे ६२ गट्टू (बॉबीन) जप्त केले आहेत.
दुसऱ्या कारवाईत पोलीस नाईक परमेश्वर दराडे यांना गोपनीय माहितीच्या आधारे, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.५) महाराणा प्रताप चौकात केलेल्या कारवाईत हर्षद विजय खंदारे याला नायलॉन मांजा विक्री करताना ताब्यात घेऊन, त्याच्याकडून १६ हजार दोनशे रुपये किमतीचे २६ नायलॉन मांजाचे रीळ जमा केले.