दुभाजक बनले जनावरांचे कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:39 PM2019-07-16T23:39:25+5:302019-07-17T00:38:49+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गवत वाढलेले आहे. हे गवताची वेळोवेळी काढले जात नसल्याने गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी थेट महामार्गाच्या दुभाजकावर नेत असून, ही जनावरे महामार्गावर येत असल्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गवत वाढलेले आहे. हे गवताची वेळोवेळी काढले जात नसल्याने गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी थेट महामार्गाच्या दुभाजकावर नेत असून, ही जनावरे महामार्गावर येत असल्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुभाजक आहे त्याठिकाणी झाडेदेखील लावण्यात आलेले असले तरी त्यांची काळजी घेतली जात नसल्यामुळे वाढ होत नसली तरी, गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे दुभाजकांवर गवत मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. ते काढले जात नाही.
महामार्गावर मुळातच वाहनांची वर्दळ असताना त्यात जनावरे गवतासाठी इकडून-तिकडे वावरत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
गुराख्यांना सूचना देण्याची गरज
शहरात काही ठिकाणी परराज्यांतील गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी मोकळ्या जागांवर घेऊन जाणे अपेक्षित असताना अनेक जनावरांना रस्त्यांवर सोडून दिले जाते़ महामार्गाच्या दुभाजकांवर जनावरे येणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची व अशा गुराखींवरदेखील कारवाईची मागणी वाहनचालक करत आहे.
४गंजमाळ तसेच सारडा सर्कल, द्वारका या चौकांमध्ये मोकाट जनावरे रस्त्यातच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो यातून अपघात होण्याचीही भीती आहे़