रस्त्यांवर जनावरे मोकाट ; नागरिकांसह वाहनचालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:01 AM2019-09-19T00:01:18+5:302019-09-19T00:10:19+5:30

गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

 Cattle on the streets; Trafficking with civilians | रस्त्यांवर जनावरे मोकाट ; नागरिकांसह वाहनचालकांना त्रास

रस्त्यांवर जनावरे मोकाट ; नागरिकांसह वाहनचालकांना त्रास

Next

नाशिक : गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे नाशिक महापालिका दुर्लक्ष करत आहे. गेल्या काही वर्षांपासून कोंडवाडे नामशेष होत चालले असून, शहरात व ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर वाढून उपद्रव वाढला आहे, याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील रस्त्यांवर सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट बघावयास मिळत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे दुचाकी वाहनधारकांना यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील जेलरोड, सारडा सर्कल, सातपूर, त्रिमूर्ती चौक, सातपूर आदी भागांत अशा मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून येत आहे. जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीचा खोळंबाही होत आहे.
काही ठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाणदेखील वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहरी व ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मोकाट जनावरे बाजारपेठेत व मुख्य रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने नागरिकांना आपली वाहने चालवणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर, गंगापूर, गोवर्धन या ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्याने रस्त्यावरील वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात.
नागरिकांमध्ये नाराजी
एखाद्या वाहनाने या जनावरांना गाडीने उडवले तर सर्व अदृश्य झालेले मालक आपला दावा दाखल करण्यासाठी तयार असतात. महापालिका अथवा गोवर्धन ग्रामपंचायत या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्याची व मालकांना दंड करण्याची तसदी सुद्धा घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
जनावरांनी रस्त्यावर केलेल्या विष्टेपासून दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महापालिका या घटनांकडे सरार्सपणे दुलक्ष करते. अशाप्रकारे जर नेहमीच वाहनचालकांचे अपघात होत असतील तर त्यांना जबाबदार नाशिक महापालिका राहणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वाहनचालकांचे नुकसानही त्यांच्याकडून भरून घेतले पाहिजे. मोकाट जनावरांचा उपद्रव करण्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यावर प्रतिबंध करण्यासाठी जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती केली पाहिजे.
मोकाट जनावरांवर वेळीच कारवाई करायला हवी रस्त्याच्या मधोमध बसल्याने तसेच घाण केल्याने दुचाकी चालक व चारचाकी चालकांची वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. जनावरांना वाचविण्याच्या भानगडीत समोरून येणाºया वाहनासोबत अपघात होते, मोकाट जनावरांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करायला हवी.
- पंकज सप्रे, आनंदवली
गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर या भागात रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे घोळका करून बसतात तिथेच घाण करतात परिणामी वाहनचालकांना आपली वाहने हळू चालवावी लागते, मागून जोरात येणाºया वाहनाने एकतर जनावरांच्या अंगावर वाहन घालते किंवा वाहन घसरून खाली तरी पडते. त्यामुळे वाहनचालकांना दुखापत होते.
- समाधान सोनावणे, रहिवासी

Web Title:  Cattle on the streets; Trafficking with civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.