मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांचा जीवघेणा प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 07:12 PM2019-11-10T19:12:43+5:302019-11-10T19:13:24+5:30
दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाणे गावाजवळ पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस असलेल्या उनंदा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनुमंतपाडा व हस्ते दुमाला या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, जीवघेण्या पद्धतीने मार्गक्रमण करावे लागत आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाणे गावाजवळ पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस असलेल्या उनंदा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनुमंतपाडा व हस्ते दुमाला या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, जीवघेण्या पद्धतीने मार्गक्रमण करावे लागत आहे.
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्ववाहिनी गोदावरी खोºयामध्ये वळविण्यात आले आहे. उनंदा नदीवर कुठल्याही प्रकारे मजबूत पूल नसल्याने गैरसोय होत आहे. स्थानिकांना आश्वासन देऊन याठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाही. आमदार नरहरी झिरवाळ यांनी या ठिकाणी तात्पुरता लोखंडी पूल बांधला असून, पुलाला कठडे नसल्याने जीव धोक्यात घालून ये-जा व शेतमाल न्यावा लागत आहे. उनंदा नदीतील सुमारे ३० फूट चाऱ्यांद्वारे हस्ते दुमाला या गावाजवळ उनंदा नदीत पाणी प्रवाहित होत आहे. ते पुढे गोदावरी खोºयातील पुणेगाव धरणात जाते. त्याचा त्रास मात्र स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.