आंबोली घाटात विदेशी मद्याचे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 02:04 AM2019-03-09T02:04:47+5:302019-03-09T02:05:14+5:30
महाराष्ट्रात बंदी असलेल्या व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारे वाहन आंबोली घाटात पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान पकडला.
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रात बंदी असलेल्या व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारे वाहन आंबोली घाटात पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान पकडला. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गुप्त खबरीवरून सदर कारवाई केली.
आंबोली घाटातून महिंद्रा बोलेरो वाहनात (क्र. आरजे ३० जीए ७५८४) सदर मद्य वाहून नेले जात होते. गुप्त खबरीनंतर पोलिसांनी सदर वाहनावर कारवाई केली असून, यात संशयित आरोपी शंकरलाल भवरलाल लोहार (३८) रा. बडासदर बाजार देवगढ, राजस्थान तसेच श्रवणसिंग शसुसिंग चौहान (३५) बुगडी कलाई, जि.पाले, राजस्थान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून विदेशी मद्याचे ८१ बॉक्स जप्त केले असुन त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे तर नवीनच असलेली महिंद्र मालवाहू बोलेरोसह ८ लाख ८५ हजार ६८२ रु पये किमतीचा माल त्र्यंबक पोलीस ठाण्याने जप्त केला आहे. ही सर्व प्रक्रि या स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस
उपनिरीक्षक एस. के. नाईक, हवालदार राजेंद्र दिवटे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, लहू भावनाथ आदींनी ही कारवाई केली.
चोरकप्प्यावर
मेंढ्यांची लोकर
आतापर्यंत या घाटामार्गे विदेशी मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी केलेल्या कारवाईची ही तिसरी-चौथी वेळ आहे. तरीही चोरटी मद्य वाहतूक होतच आहे. आताही या वाहनात विदेशी मद्याचे ८१ बॉक्स चोर कप्प्यात ठेवलेले होते तर वरवर त्यात मेंढ्यांची लोकर भरलेली पोती होती. अशाही अवस्थेत पोलिसांनी विदेशी मद्याचा चोरकप्पा शोधून काढलाच. सध्या निवडणुकीचा माहौल असल्याने चोरट्या मद्याच्या वाहतुकीला ऊत येणार आहे. अंबोली चेक पोस्ट या ठिकाणी कायम गस्ती पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.
फोटो- ०८ त्र्यंबक वाईन आणि ०८ त्र्यंबक वाईन-१ या नावाने फोटो आयएनटीपीचएला सेव्ह आहे.
पोलिसांनी अंबोली घाटात पकडलेले विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहन तर दुसऱ्या छायाचित्रात विदेशी मद्याचे बॉक्स.